Saturday, May 16, 2026
Google search engine

चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ उत्कृष्ट कार्यगौरव प्रमाणपत्राने सन्मानित

चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ उत्कृष्ट कार्यगौरव प्रमाणपत्राने सन्मानित

सुरेंद्र इखारे वणी  :- महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेस्काम ) नेरूळ मुंबई* अंतर्गत पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग अकोला-अमरावती यांचे कडुन चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ला उत्कृष्ट कार्य गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
दिनांक 29 आगष्टला 2025 ला पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग अमरावती-अकोला ची वार्षीक सर्व साधारण सभा
जेष्ठ नागरिक भवन,बालाजी सोसायटी यवतमाळ येथे संपन्न झाली.या सभेत चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ने महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघ चळवळीत गाव तेथे संघ स्थापन करण्याच्या भूमिकेत पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागात उत्तम कार्य केल्याबद्दल व सोबतच जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी व आरोग्य विषयक समस्या निराकरण करण्यासाठी आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक जनजागृती साठी तज्ञ डाॅक्टराचे मार्गदर्शन व कायदेविषयक सल्लागार व मार्गदर्शन शिबिर इ.विविध उपक्रम राबवित उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल *उत्कृष्ट कार्य गौरव* प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डाॅ.पुरुषोत्तम गावंडे व सचीव श्री.पांडुरंग ढुमणे, उपाध्यक्ष श्री.नागोराव मोहोड,यवतमाळ जिल्हा समन्वय समिती चे अध्यक्ष श्री.क्रुष्णराव माकोडे, उपाध्यक्ष व श्री. देशमुख सर,संघटन सचिव श्रीराम चव्हाण,श्री.रेणुकादास जोशी इ.हजर होते.
चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष श्री.उदयराव गोहोकार ,उपाध्यक्ष श्री.लक्ष्मण इद्दे,सचीव श्री.रामदास बोढे, सहसचीव श्री.नाना विधाते, कोषाध्यक्ष श्री.सुभाष आत्राम,सौ.निलीमा काळे अध्यक्षा महिला समिती वणी व कार्यकारिणी मंडळातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने प्राप्त झालेल्या या यशाचे सर्व जेष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांनी व सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular