आदर्शमध्ये विपश्यना व आनापान साधना शिबिर संपन्न.
सुरेंद्र इखारे वणी :- शालेय विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकता यावे याकरिता विद्या प्राधिकरणाने राज्यातील सर्व शाळेत मित्र उपक्रम सुरू केला. त्या अनुषंगाने व शासन आदेशान्वये वणी येथील आदर्श हायस्कूलमध्ये विपश्यना व आनापान साधना शिबिर घेण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना भावात्मक, बौद्धिक व हितात्मक विकास साधण्याकरिता एक तासाचे प्रशिक्षण देण्यात आले. जीवनात सकारात्मक प्रयोगाकडे बघायचे असेल तर वैज्ञानिक असणारी विपश्यना व आनापान साधना विद्यार्थी व शिक्षकांनी स्वीकारली पाहिजेत असे मत विपशनाचार्य वैजनाथ खडसे यांनी व्यक्त केले. या शिबिराचा शाळेतील 450, विद्यार्थी व 23, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला. या उपक्रमातून परीक्षेची काळजी, चिंता विद्यार्थी आत्मविश्वासने हाताळू शकतात. या साधनेच्या दैनंदिन सरावाने एकाग्रता, वाढते, मनाची जागृती,सतर्कता, वाढते. स्वयंशासन, स्मरणशक्ती निर्णय क्षमता वाढते. भीती, राग, चीड व उदासीनता कमी होते. अभ्यास आणि खेळासह इतरही उपक्रमांमध्ये सहभाग वाढतो. शिक्षक विद्यार्थी स्नेहभाव वाढण्यास मदत होते. यशस्वितेसाठी प्राचार्य आर एल मोहिते, पर्यवेक्षक एस आर पिदुरकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




