विद्यापीठात वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन
जयंत साठे नागपूर : वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सामूहिक गायन करण्यात आले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), प्रभारी कुलसचिव हरीश पालीवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘वंदे मातरम् ‘ या गीतास ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने विद्यापीठात वंदे मातरम् या गीताचा सामूहिक गायन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम आयोजित करण्याबाबत प्रभारी कुलसचिव हरीश पालीवाल यांनी माहिती दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी वंदे मातरम् या गीताचे सामुहिक गायन केले. या कार्यक्रमाला विविध प्राधिकरणांचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.




