वणीच्या महसूल भवनात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षणाचा समारोप उत्साहपूर्ण संपन्न झाला
“ मानवता हा सेवाभाव समजून कार्य करा असे आव्हान”
सुरेंद्र इखारे वणी :- येथील महसूल भवनात भारताची जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाच्या 2 ते 5 मे 2026 या तीन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप उत्साहपूर्ण संपन्न झाला.
या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निमेकर साहेब तहसीलदार हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र बच्चेवार सर, प्रवीण वैद्य सर, प्रमोद ढेंगळे सर,सुरेश बदखल सर, महादेव शिंदे तंत्रस्नेही, ऋषी सुरपाम तंत्रस्नेही, योगेश कोणापुरे तहसील अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद ढेंगळे सर यांनी केले याप्रसंगी राष्ट्रीय जनगणना प्रशिक्षणा संदर्भात प्रशिक्षणार्थी प्रवीण ढेंगळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना फिल्ड वर्क यामधून अनुभव कथन केले, सुरेश काटेखाय यांनी हसत खेळत प्रशिक्षणातून आत्मविश्वास निर्माण झाल्याचा विश्वास व्यक्त केला, दगडी सर यांनी राष्ट्रीय काम हे जीव सांभाळून करा , स्नेहा गोखरे यांनी या प्रशिक्षणात तंत्रज्ञानाची चांगल्या पद्धतीने ओळख करून दिली, प्रमोद काकडे व रोहिणी मॅडम यांनी पुस्तकवाचनापेक्षा प्रत्यक्षिकातून मिळालेला अनुभव हा जनगणनेसाठी आत्मविश्वास निर्माण करणारा होता असे मत व्यक्त केले. तसेच मार्गदर्शक देवेंद्र बच्चेवार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आम्ही शासनाचे आदेशानुसार राष्ट्रीय जनगणनेचे प्रशिक्षण हे प्रमानभाषेत देण्याचा प्रयत्न केला तसेच 1 ते 34 प्रश्न प्रमाणित वापरण्याचे सांगितले, कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार निमेकर साहेब यांनी तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन प्रशिक्षण पूर्ण केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रवीण वैद्य सर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांकडून सेवा भाव प्रतिज्ञा म्हणून घेतली. कार्यक्रमाचा समारोप “प्रभू तुम मुझे शक्ती दो, खुदपर करो विश्वास” या प्रेरणादायी प्रार्थनेने करण्यात आला.





