Wednesday, June 24, 2026
Google search engine

यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी पावत्या वितरणाचा प्रश्न निकाली🔹

🔸यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी पावत्या वितरणाचा प्रश्न निकाली🔹

*🔹श्री किरणरावजी सरनाईक, शिक्षक आमदार,अमरावती विभाग यांच्या सततच्या पाठपुराव्याचे यश🔸*
सुरेंद्र इखारे वणी   :-  यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी पावती वितरण मागील दहा ते बारा वर्षांपासून प्रलंबित होते. ही समस्या निकाली निघाली असून, यवतमाळ जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी धारक 391 शाळेतील 3012 कर्मचाऱ्यांपैकी कालपर्यंत एकूण 1558 कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी पावत्या वितरित करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 1454 कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी पावत्या ऑगस्ट अखेर वितरित करण्यात येतील. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.*
* या संदर्भात श्री किरणरावजी सरनाईक यांनी नेहमी माहिती घेत पाठपुरावा केला. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सुद्धा सादर केली व आगामी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न सुद्धा सादर केलेला आहे.आता हा प्रश्न निकाली निघाला असून ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी हिशेब पावत्या वितरित केल्या जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular