नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून येणाऱ्या काळात विद्यार्थी वैश्विक नागरिक बनेल- प्रीतेश लखामापुरे
सुरेंद्र इखारे वणी :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 चे प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी तज्ञ मार्गदर्शक प्रीतेश लखमापुरे मार्गदर्शन करताना म्हणाले की येणाऱ्या काळात या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होऊन एक वैश्विक नागरिक बनतील असा विश्वास व्यक्त केला .
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणाचे प्रशिक्षण या नवीन वर्षात 2025 मध्ये या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा दिनांक 10 मार्च ते 15 मार्च 2025 या कालावधीत लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे सुरू आहे या प्रशिक्षणासाठी वणी तालुक्याचे समन्वयक श्री विनोद नासरे सर आणि तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा श्री आनंद हूडसर, प्रा श्री गणेश लोहे सर, श्री प्रितेश लखमापुरे सर,श्री हेमंत तीमांडे सर,श्री सुनील झाडे सर श्री गोपाल शिरपूरकर सर, कु वृषाली देशमुख मॅडम, कु प्रमुना भोयर मॅडम उपस्थित राहून तालुक्यातील शिक्षक प्रशिक्षणार्थ्याना अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत आहे या प्रशिक्षणाला वणी तालुक्यातील 150 प्रशिक्षणार्थी आपल्या व्यस्त असलेल्या कालावधीतही 100% उपस्थित राहून प्रशिक्षण घेत आहे.





