संविधान सभेत असलेल्या लोकांपेक्षा डॉ बाबासाहेबांची भूमिका वेगळी :– मा प्रा डॉ प्रकाश सिरसाट
सुरेंद्र इखारे वणी :- संविधान असत कश्यासाठी तर तुमचा समाज कुठल्या पद्धतीने चालेल यासाठी हा एक दस्तऐवज आहे. या दस्ताऐवजाच्या अधिपत्याखाली हे सगळं चलन वळण समाजात होत. या दस्ताऐवजाच्या अवस्था व त्याचा समाजावर काय परिणाम होतो . हे सांगत असताना कुठलाही वर्तमान काळ हा भूतकाळाच्या प्रभावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेबानी काय काय करण्याचा प्रयत्न केला. यात उद्देश ,हेतू व अपेक्षा काय होत्या त्यासाठी संविधान कश्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु या संविधान सभेमध्ये असलेले जे लोक होते त्या लोकांपेक्षा बाबासाहेबांची भूमिका वेगळी होती. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्रा डॉ प्रकाश सिरसाट यांनी प्रतिपादित केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी च्या वतीने संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा प्रा डॉ प्रकाश सिरसाट हे होते. प्रा।उख व्याख्याते मा प्राचार्य डॉ प्रमोद हेरोडे, मा प्रा तक्षशिल सुटे हे उपस्थित होते तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष संजय तेलंग , प्रा पुरुषोत्तम पाटील, श्रीकृष्ण सोनारखन , दिगंबर पुनवटकर, हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचारमंचाचे अध्यक्ष संजय तेलंग यांनी केले कार्यक्रमाचे व्याख्याते मा प्रा तक्षशिल सुटे यांनी भारतीय संविधान : अनु जाती जमाती व ओबीसी समाजपुढील आव्हाने हा विषय प्रतिपादित करीत असताना ते म्हणाले भारतीय संविधान का? निर्माण करण्यात आले या संविधानाने काय दिले , उद्देश काय होता हे समजावून सांगण्यासाठी भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर विखुरलेला भारत एकसंघ कसा करायचा ही जबाबदारी भारतीयांवर येऊन पडली हा देश एक झाल्याशिवाय राष्ट्र बनल्याशीवाय विकासाच्या प्रवाहात आणणे शक्य नव्हते असे बाबासाहेबानी जाणले तेव्हा या उद्देशपत्रिके मधील आम्ही हा शब्द एका स्वप्नाच वास्तव आहे. या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही अशी ग्वाही बाबासाहेबानी दिली कारण बाबासाहेबानी “आम्ही” हा शब्द एका मोठ्या व्यापक अर्थाने वापरला तेव्हाच समाजपुढील आव्हाने समजून घेता येईल असे प्रतिपादित केले. त्यानंतर दुसरे व्यख्याते मा प्राचार्य डॉ प्रमोद हेरोडे यांनी भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या विषयावर प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठमके सर यांनी केले तर आभार आयोजकांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.