Sunday, January 26, 2025
Google search engine

रायपूर येथील पाण्याच्या टॉकीवर महिलेच्या “शोले” आंदोलनाची आ. संजय देरकरांच्या पुढाकारातून सांगता

 

रायपूर येथील पाण्याच्या टॉकीवर महिलेच्या “शोले” आंदोलनाची आ. संजय देरकरांच्या पुढाकारातून सांगता

सुरेंद्र इखारे वणी :- विधानसभा क्षेत्रातील झरीजामनी तालुक्यातील रायपूर या छोट्याश्या गावातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने तारीख १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पासून गावच्या विकासासाठी चक्क पाण्याच्या टॉकीवर चढून आमरण उपोषण सुरू केले असता या आंदोलनाने प्रशासनाची धावाधाव झाली होती. या आंदोलनाची माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी दोन तासात सर्व अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी उपस्थित करून आंदोलकांची मागण्या मान्य करून आंदोलनाची सांगता केली.

झरीजामानी हा आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास कुठेच दिसून येत नाही. अनेक आदिवासी गावांमध्ये जाण्यासाठी सुरळीत रस्ते नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्मशानभूमी नाही, त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाही, अंगनवाड्यांचे प्रश्न आहे. गावच्या मूलभूत गरजेच्या अनेक समस्या आहे.

अश्यातच रायपूर हे एक आदिवासी समाजाचं पोड आहे. या ठिकाणी केवळ ४० घरे असून १७० लोकसंख्या आहे. हे गाव भाजपचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या लिंगटी या गावाला लागून असून मागील मागील दहावर्ष सत्तेतील आमदारकी भोगून देखील या गावच्या मूलभूत गरजा पूर्ण करता अल्या नाही. त्यामुळे स्वताला विकास पुरुष संबोधून विकास होत नाही तर गावाची परिस्थिती सर्वकाही बोलून जात होती.

रायपूर या गावातील सामाजिक कार्यकर्त्या क्रांतीवीर शामादादा कोलाम महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंद्रे यांनी गावात जाण्याचा रस्ता तत्काळ करून मिळावा, स्मशानभूमीच्या प्रश्न निपटारी लावून त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता तयार करून मिळावा, गावातील चावडी जवळील सभागृहाचे काम चालू करावे, आणि इतर समस्या घेवून शासनाच्या दरबारी चकरा मारून थकल्या नंतर सरळ पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आमरण उपोषणाचे शस्त्र उभरताच प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडवून दिली.

या आंदोलनाची माहिती वणीचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी सर्व संबंधित प्रशनातील अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी हजर राहण्याचे आदेश दिले असता सर्व विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हे हजार झाले. आ. संजय दरेकर यांनी काल तारीख १३ डिसेंबर रोजी रायपूर गाठून अधिकारी व कर्मचारी व आंदोलक यंचेसोबत यशस्वीरित्या चर्चा करून पुढील दोन महिन्यात आंदोलनाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देवून संबंधितांना त्या पद्धतीने कार्य करण्याचे सुचवून आंदोलनाची सांगता केली. आ. देरकर यांच्या धडाडीच्या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष तथा काँग्रेस नेते राजू येल्टीवार, श्रीगुरूदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, युवक कांग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष राहूल धांडेकर, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष निलेश येल्टीवार, माजी सभापती संदीप बर्रेवार, सरपांचा गीता पुसाम, युवा सेनेचे समीर लेनगुरे, सेनेचे संदीप विंचू, झरीचे तहसिलदार रासने सा. बां. विभागाचे मून ,पं.स.विस्तार अधिकारी कैलास जाधव , तलाठी मोरे , भूमिअभिलेख विभागाचे विलास मुत्यालवार आदिवासी प्रकल्प विभागाचे सोनटक्के ग्रामसेवक प्रकाश बळीत, हरिदास गुर्जलवार, दिवाकर पुसाम, नागोराव उरवते, अरविंद भेडोडकर,
उपसरपंच सतीश टेकाम, सदस्य अमोल तेलंग,, लक्ष्मीबाई मंडपाचे, गीताताई नैताम, सुवर्णा पदकांतीवर, गंगाधर अत्राम, शंकर अकुलवार, विनोद उप्परवार, सतीश अदेवार, दयाकर गेडाम, अनिल डेगरवार आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular