Tuesday, May 20, 2025
Google search engine

आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्येचे निवेदन गौरव पंधरे यांनी  आमदार संजयभाऊ दरेकर यांना दिले 

आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्येचे निवेदन गौरव पंधरे यांनी  आमदार संजयभाऊ दरेकर यांना दिले

सुरेंद्र इखारे वणी    :-    आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत यवतमाळ येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी ४ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत, शासनाला वेळोवेळी वस्तीगृहातील समस्या निदर्शनात आणून दिल्या परंतु आज पर्यंत त्या समस्येचे निराकरण झाले नाही.त्यामुळे वसतिगृहातील समस्याचे निवेदन  गौरव पंधरे यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर याना दिले

यवतमाळ येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी समस्येने ग्रासलेली असल्याने वारंवार शासनाकडे समस्यांचे निवेदन सादर करून सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर  याना विविध समस्यांचे निवेदन देऊन समस्या निकालात काढाव्यात अशी मागणी केली आहे  यामध्ये खालील प्रमाणे
१) महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येक वर्षी आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या वस्तीगृहामध्ये लागू असलेल्या डी.बी.टी (DBT) या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्याबाबत
२) आदिवासी वस्तीगृहात प्रवेश झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला 85 टक्के वस्तीगृहात राहणे बंधनकारक करण्यात यावे. आणि सतत ६० दिवस वस्तीगृहात विद्यार्थी व विद्यार्थिनी गैरहजर असल्यास वस्तीगृहातून त्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावा. अशी मागणी घेऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी चार दिवसापासून उपोषणाला बसले असून शासनाचे या उपोषणाकडे दुर्लक्ष असल्याने विद्यार्थी बिरसा ब्रिगेडचे गौरवभाऊ पंधरे , राहुल भाऊ दांडेकर , चेतनभाऊ मॅकलवर ,यांनी  नागपूर गाठून  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात आमदार शिवसेना (उबाठा) संजय देरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular