Saturday, April 26, 2025
Google search engine

वीज पडून मृत पडलेल्या महिलेच्या वारसांना ४ लाख रुपयाची शासनाची मदत 

वीज पडून मृत पडलेल्या महिलेच्या वारसांना ४ लाख रुपयाची शासनाची मदत 

मारेगाव तालुक्यातील केगाव येथे घडली होती घटना

सुरेंद्र इखारे वणी :- विधानसभा क्षेत्रातील केगाव तालुका मारेगाव येथील रहीवासी मेघा गणपत पानघाटे यांच्यावर दिनांक २७ डिसेंबर रोजी सायंकाळी अदांजे ६ वाजता दरम्यान नैसर्गिक विज पडून मृत पावलेल्या होत्या त्यांच्या वारसांना आज ४ लाखाची शासकीय मदत आमदार संजय देरकर यांच्या हस्ते तहसील कार्यालय मारेगाव येथे दुपारी १ वाजता देण्यात आली आहे.
मेघा गणपत पानघाटे ह्या शेतातून घरी येत असताना त्यांचे अंगावर वीज पडली व त्या जागीच मृत पवल्या होत्या ही नैसर्गिक घटना असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते मृत मेघा पानघाटे यांचे पती गणपत पानघाटे यांचे खात्यात थेट ४ लाख जमा झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर नायब तहसीलदार रामगुंडे, मधुकर वरपटकर, अजय कवरासे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular