साखरा कोलगाव येथील आदर्श हायस्कुलचे प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र बच्चेवार यांचे हृदय विकाराचे दाबामुळे निधन
सुरेंद्र इखारे वणी:- तालुक्यातील आदर्श हायस्कुल साखरा कोलगाव येथील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र बच्चेवार यांचे अकस्मात हृदयविकाराचे दाबामूळे आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोज गुरुवारला सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान अमरावती येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले
त्यांचे पाठीमागे पत्नी,मुले भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे . त्यांचे उद्या दिनांक 17 जानेवारीला त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजेंद्र बच्चेवार हे यापूर्वी आदर्श हायस्कुल मुकुटबन येथे बरेच वर्ष कार्यरत असल्याने पत्रकार म्हणून सुद्धा काम केलं आहे. त्यामुळे संपुर्ण परिसर त्यांना ओळखत होते परंतु वणी तालुक्यातील साखरा कोलगाव येथील आदर्श हायस्कुलला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्याठिकाणी त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने सर्वांना आपलेसे करून टाकले होते. अशा या मनमिळावू व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण मित्रपरिवार ,नातेवाईक व परिवारावर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे .