Monday, January 12, 2026
Google search engine

वणी येथील खंडोबा- वाघोबा सभागृहात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने स्नेहमीलन सोहळा संपन्न

वणी येथील खंडोबा- वाघोबा सभागृहात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने स्नेहमीलन सोहळा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी  :-    राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला विचारमंच वणीच्या वतीने दिनांक 18 जानेवारी 2025 रोज शनिवारला दुपारी 3.00 वाजता खंडोबा- वाघोबा सभागृहात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने स्नेहमीलन सोहळा संपन्न झाला.

स्नेहमीलन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महिला विचारमंचाचे अध्यक्षा सौ प्रतिभा लोंढे ह्या होत्या प्रमुख अतिथी उपाध्यक्षा सौ विद्या येवले, सौवंदना उरकुडे, सौ सरिता शेरकी, सौ माया मत्ते,सौ सुनीता पचकटे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी राजमाता मा जिजाऊ व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ नीलिमा तुराळे यांनी केले तसेच यावेळी उपस्थित महिलांडळींनी उखाणे, कविता,अभंग व गितगायन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ प्रतिभा लोंढे यांनी अध्यक्षीय भाषणातून महिलाना मकरसंक्रांतीचे महत्व पटवून दिले. तसेच सौ विद्या येवले यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी महिलांनी एकमेकींना वाण्याच्या रुपात थोर महिलांची पुस्तके भेट म्हणनू देण्यात आली .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वनिता हुलके यांनी केले तर आभार सौ संगीता इखारे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सौ, वनिता काळे, सौ वैशाली काळे,सौ कल्पना ढवळे, सौआशा पाल, सौभाग्यश्री वैद्य,सौ सुनंदा पंडिले,सौ विभा चिडे,सौ स्मिता ढवळे, सौ ललिता ढवळे, सौ सविता बुच्चे, सौ सविता निकुंबे,सौ  वंदना चामाटे,सौ रजनी गालाट, सौ मनीषा लोंढे,सौ प्रियंका चाहनकर,सौ जयश्री ढवळे, सौ शालू गिलबिले, सौ सरिता गिलबिले,सौ आसकर , तथा  राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला विचारमंचाचे महिलांनी परिश्रम घेतले. यावेळी अल्पपोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular