भारतीय जनता पार्टीच्या वतीने वणी व लगतच्या गावासाठी ‘बाप्पा माझा” या स्पर्धेचे आयोजन
दोन्ही गटातील गणेशोत्सव मंडळांना आकर्षक पारितोषिक व सन्मानचिन्हाने गौरविण्यात येईल
सुरेंद्र इखारे वणी : यावर्षी वणीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व स्वदेशी वस्तूंचा वापर याबाबत जनजागृती व्हावी तसेच गणेशोत्सवात अधिक सुंदर पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारे , देखावे असावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने ‘बाप्पा माझा ‘ या 2026 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये दोन गटांचा समावेश आहे यामध्ये ‘अ’ गटात घरगुती गणपती आणि ‘ब’ गटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतील. दोन्ही गटांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर किंवा पर्यावरण संवर्धन या दोनपैकी एका विषयावर आकर्षक देखावा सादर करणे आवश्यक आहे.
दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास ₹५,००० व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ₹३,००० व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास ₹२,००० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी स्पर्धेचे स्वरूप व नियम याना अधीन राहून देखाव्याचे परीक्षण करण्यात येईल . स्पर्धकांनी दि. १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत दिलेल्या क्रमांकानुसार नोंदणी करून व्हॉट्सॲपद्वारे आपल्या देखाव्याचा फोटो पाठवायचा आहे. त्यानंतर दि. १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजक व परीक्षक प्रत्यक्ष घरी अथवा मंडळाला भेट देऊन देखाव्याचे परीक्षण करतील.
स्पर्धा फक्त वणी शहर आणि लगतचे गावा करिता मर्यादित राहणार आहे.
घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवामधील निवड झालेल्या प्रत्येकी २० नोंदणींचे परीक्षण करण्यात येईल. नोंदणी करताना घराचा अथवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संपूर्ण पत्ता तसेच मोबाईल क्रमांक आयोजकांकडे व्हॉट्सॲपद्वारे देणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी शक्यतो सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत व्हॉट्सॲप अथवा फोनद्वारे संपर्क साधावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.या अभिनव उपक्रमात वणी शहरातील नागरिकांनी, गणेशभक्तांनी तसेच गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.
या स्पर्धेचे संयोजक मनोज सरमुकदम हे असून सहसंयोजक : गणेश आसूटकर, बालाजी भेदोडकर, उमेश गंधारे, डॉ. सौ. नीलिमा दवणे, वैशाली वातिले, आरती गणेश वांढरे, संगीता मेश्राम, प्रिती बिडकर, पूजा रामगिरवार हे आहेत, इच्छुकांनी यांच्याशी संपर्क साधावा.




