वणी पंचायत समितीतील मुख्याध्यापकांची यु – डायस सभा संपन्न
सुरेंद्र इखारे वणी :- पंचायत समिती वणी अंतर्गत सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांची आज दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोज बुधवारला दुपारी 1.00 वाजता संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल ,सर्वोदय चौक वणी येथे शैक्षणिक सत्र 2026-2027 चे यु – डायस ची सभा संपन्न झाली.
यावेळी सभेला उपस्थित वणी पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी निलेश हेडाऊ, विस्तारअधिकारी गणेश भोयर, समन्वयक विनोद नासरे, बीआरसी चे कर्मचारी सतीश कुरेकर, व संदीप ठाकरे उपस्थित होते .
याप्रसंगी युडायस संदर्भात माहिती देत असताना शिक्षण विस्तार अधिकारी निलेश हेडवू यांनी शासनाचे विविध उपक्रमाविषयी माहिती दिली . यामध्ये आयुष्यमान भारत, सेवा संकल्प अभियान,तसेच शालेय विद्यार्थ्यांची जबाबदारी सांगत असताना शेलु येथील विद्यार्थी दुर्घटनेचा दाखला दिला. तसेच समन्वयक विनोद नासरे यांनी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी बाबत माहिती दिली. संदीप ठाकरे यांनी वर्ग 5,9 व 11वि च्या विद्यार्थ्यांकरिता नवोदय विद्यार्थी प्रवेशा संदर्भात माहिती दिली. यानंतर सतीश कुरेकर यांनी यु डायस प्लस च्या संदर्भात माहिती देत असताना सर्वोप्रथम फॉर्म SO2,03,04, स्टुडन्ट पोर्टल, टीचर पोर्टल, व यु डायस फॉर्म कश्या प्रकारे भरायचा याबाबत माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन व आभार विनोद नासरे यांनी मानले. सभेला मोठ्या प्रमाणात सर्व माध्यमांचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख उपस्थित होते. या सभेच्या यशस्वीतेसाठी वणी पंचायत समिती शिक्षण विभाग व संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
वणी पंचायत समितीतील मुख्याध्यापकांची यु – डायस सभा संपन्न




