तुकड्याची झोपडी स्मरणिका प्रकाशन व माणिक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न.
सुरेंद्र इखारे वणी :- येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात ग्राम स्वराज्य महामंच द्वारा आयोजित तुकड्याची झोपडी स्मरणिका प्रकाशन व मानवतावादी विचारांची अदभुत शक्ती असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी माणिक रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारप्रेरणेतून गावातील सामान्य माणूस एका पुस्तकात प्रकाशित व्हावा आणि त्यांचे व्यक्तिमत्व सर्व स्तरातील घटकाला माहीत व्हावे हा ही स्मरणिका प्रकाशित करण्याचा एकमेव उद्देश आहे. तसेच सामान्य व्यक्तीमध्ये जो मानवतावादी व सामाजिक विचार आहे त्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून माणिक रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासाठी हा उपक्रम आहे. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते तुकड्याची झोपडी स्मरणिका प्रकाशन व माणिक रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात कृष्णा भोंगाडे, बळवंत मडावी, प्रतिभा पवार, राष्ट्रपाल भोंगाडे, कैलास चव्हाण, सुहासिनी खडसे, होमदेव किनाके, डॉक्टर रवी कुमरे, श्रावण पडसेकुन, प्रीती दीडमुठे, मिना वाघ, चंपत पाचभाई, सुदाम राठोड, सुनिल गावंडे आदींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा मोहनजी वडतकर उपस्थित होते. अथिती म्हणून अँड वामनराव चटप माजी आमदार, किरण देरकर, आशाताई काळे, डॉक्टर रेखाताई निमजे व स्वागताध्यक्ष म्हणून गिरिधर ससनकर उपस्थित होते. सूत्रसंचलन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक मधुसूदन कोवे यांनी मानले तर आभार डॉक्टर रेखाताई नीमजे यांनी मानले. यशस्वितेसाठी चंपत पाचभाई, भारत करडे व ग्राम स्वराज्य महमंच च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.





