भालरच्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने; ऍड देविदास काळे
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील भालर येथील तुकडोजी महाराज विद्यालयात वर्ग 10 वि च्या निरोप समारंभ प्रसंगी विविध कार्यक्रमांतर्गत मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक ऍड श्री.देविदासजी काळे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुनील भाऊ वरारकर उपस्थित होते.प्रमुख अतिथी मारोतराव ठेंगणे सर,ग्रामगीताचार्य सौ. विजयाताई दहेकर व कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पी.आय. कू.अश्विनी रायबोले हे उपस्थित होते. याप्रसंगी मारोतराव ठेंगणे सर व सौ. विजयाताई दहेकर यांनी मानवी जीवनात ग्रामगितेचे महत्व काय आहे हे समजावून सांगितले तसेच पी आय अश्विनी रायबोले यांनी पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन केले तर भविष्यातील विद्यार्थ्यांसमोर आव्हाने याबाबत ऍड श्री देविदासजी काळे यांनी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमांतर्गतमा उपस्थित मान्यवर श्री.देविदासजी काळे यांचा सत्कार संस्थेचे सचिव मा.श्री.सूनिलभाऊ वरारकर यांनी केला, मा.श्री. मारोतराव ठेंगणे यांचा सत्कार मुख्याध्यापक मनोज वरारकर यांचे हस्ते करण्यात आला , सौ.विजयाताई दहेकर यांचा सत्कार कू. सुप्रिया झाडे यांनी केला तर कू.अश्विनी रायबोले यांचा सत्कार कू.गौरी डोहे आणि कू.अक्षरा देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज वरारकर यांनी केले तसेच सहाय्यक शिक्षक लक्ष्मण ढेंगळे,राजेंद्र खिरटकर,अविनाश वरपटकर, बंडू अडबाले, नत्थु जेऊरकर कू.सुप्रिया झाडे यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास खुजे व मानसी डाहुले यांनी केले तर आभार कू.तुलशी निमकर हिने मानले
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तुकाराम ढेंगळे ,भास्कर हेपट,धनराज वाघमारे,.सुरेश हेपट,.बंडू धोंगडे यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता सामूहिक भोजनाच्या आस्वादाने झाली