Saturday, May 16, 2026
Google search engine

वणी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात केंद्रसंचालक व रनर यांची सभा संपन्न

वणी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात केंद्रसंचालक व रनर यांची सभा संपन्न

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे आवाहन

सुरेंद्र इखारे वणी :-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी 2025 पासून होऊ घातलेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षांची सुरुवात होत असल्याने वणी तालुक्यातील 13 केंद्रसंचालक व रनर यांची सभा बोलावून शासनाच्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती करून संपूर्ण परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणात घेण्याचे आवाहन परीरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी केले आहे.

वणी तालुक्यात दहावीच्या 13 केंद्रावर दोन हजार 482 विद्यार्थी परीक्षेला बसले आहे . ही परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणात झाली पाहिजे . परीक्षा काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये . तसेच केंद्रसंचालकांनी व रनर यांनी दक्षता घ्यावी . विद्यार्थ्यांमध्ये कॉपीमुक्त वातावरण निर्माण करावे अशा सूचना देण्यात आल्या. केंद्र निहाय केंद्र क्रमांक 1900 या केंद्रावर 289 विद्यार्थी, 1901 केंद्रावर 390 विद्यार्थी, 1902- 299 विद्यार्थी, 1903- 257 विद्यार्थी, 1904- 140 विद्यार्थी, 1905- 124 विद्यार्थी, 1906- 108 विद्यार्थी, 1907- 121 विद्यार्थी, 1908- 141 विद्यार्थी, 1909- 203 विद्यार्थी, 1910- 89 विद्यार्थी, 1911- 182 विद्यार्थी व 1912 या केंद्रावर 139 विद्यार्थी असे दहावीच्या 13 परीक्षा केंद्रावर 2 हजार 482 विद्यार्थी परीक्षा देणार आहे.यामध्ये प्रामुख्याने एक केंद्र आदर्श हायस्कुल घोंसा हे संवेदनशील केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेव्हा सर्व केंद्रसंचालकांनी व रनर यांनी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घ्यावी असे आवाहन केले आहे .   डी सी 55 चे परीरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर, व सहायक परीरक्षक गणेश निकोले  हे  दहावीच्या परीक्षेची जबाबदारी पार पडणार आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular