Tuesday, March 10, 2026
Google search engine

*उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक राज्यस्तरीय महोत्सवात अमरावती विद्यापीठाच्या चमूची सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ म्हणून निवड*

*उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक राज्यस्तरीय महोत्सवात अमरावती विद्यापीठाच्या चमूची सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ म्हणून निवड*

*चमू व्यवस्थापक डॉ.निलीमा दवणे यांच्या सह कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन !!*
सुरेंद्र इखारे वणी :-
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या उत्कर्ष सामाजिक व सांस्कृतिक राज्यस्तरीय महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या चमूची सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ म्हणून निवड करण्यात आली असून लोकमान्य टिळक  महाविद्यालयाच्या  चमू व्यवस्थापक  डॉ.निलीमा दवणे यांनी केलेल्या कार्यप्रसिध्दी अहवालाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी स्वयंसेवकांच्या या कामगिरीबद्दल भरभरुन कौतूक करुन ही बाब विद्यापीठाकरिता अभिमानाची व गौरवास्पद असून राज्यस्तरीय पातळीवर विद्यापीठाचे नाव उंचावणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्यात. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमधील ऋषिकेश राऊत, मानस एलगुंडे, प्रथमेश चोैधरी, तन्मय जगताप, यश कांबळे, शुभम दहेदांडे, रितेश वाणी, अनिकेत राठोड, सम्यक तेलमोरे व कु. सुहानी पाटील, कु. कांचन वानखडे, कु. समृध्दी मुळे, कु. दिशा कवळे, कु. साक्षी महल्ले, कु. प्रेरणा देशमुख, कु. रिया केदार, कु. साक्षी गीरी, कु. भावना उपाध्ये अशा 18 स्वयंसेवक आणि यवतमाळ जिल्हा समन्वयक डॉ.निलीमा दवने यांनी चमू व्यवस्थापक म्हणून सहभाग घेतला. महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील रा.से.यो. च्या 304 स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांनी भाग घेतला. स्वयसेवकांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular