वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0
प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा 10 ते 15 मार्च 2025
सुरेंद्र इखारे वणी:- वणी तालुक्यातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांचे “ शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 “या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात दिनांक 10 मार्च पासून सुरू झाला असून आज प्रशिक्षणाचा दुसरा दिवस संपन्न झाला आहे.
यावर्षीच्या 2024 -25 च्या शैक्षणिक सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैविध्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा 10मार्च पासून सुरू झाला आहे या प्रशिक्षणाचे समनव्यक साधनव्यक्ती विनोद नासरे यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण होत आहे. या प्रशिक्षणाचे सुलभक प्रा.श्री आनंद अनिल हूड ,प्रा.श्री गणेश महादेव लोहे , श्री प्रीतेश मुरलीधरराव लखमापुरे
,श्री हेमंत ईशवरराव तिमांडे , श्री गोपाल शिरपूरकर , श्री सुनील झाडे, कु.वृषाली देशमुख , कु.प्रमुना भोयर हे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा 2.0 चे तज्ञ मार्गदर्शक आहे. यांनी दुसऱ्या दिवशीही व्हिडीओ च्या माध्यमातून प्रश्न निर्मितीचे कौशल्य कसे विकसित करायचे व प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रत्यक्षात प्रश्नांची निर्मिती करून घेतली. त्यामुळे हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल असे या प्रशिक्षणातून दिसून आले आहे.परंतु
वर्ग 10 वि व 12 वि ची बोर्डाची परीक्षा सुरू असतांनाही या प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.