डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथे लोकशाही दिन
———————————————
नागपूर ( जयंत साठे ) दि.२४ मार्च, : महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर कार्यालयात दि.25 मार्च, 2025 रोजी दु.12.00 ते 1.00 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरीकांना समाज कल्याण विभागाशी संबंधित काही तक्रारी असेल तर त्यांनी तक्रार/निवेदन अर्ज घेऊन A विंग, पहिला माळा, रुम नं.101, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंदपेठ नागपूर येथे स्वत: उपस्थित राहावे. असे आवाहन श्री. बाबासाहेब देशमुख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे.