विदर्भ नृत्य स्पर्धेत योगन्या वासेकर व सुरज धनुष्यकर प्रथम …
सुरेंद्र इखारे वणी :- शहरातील शेतकरी लॉन येथे 22 मार्च ला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विदर्भ नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी भव्य विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे, उद्घाटक एकविरा महिला पतसंस्थेचे अध्यक्ष किरण देरकर, प्रमुख पाहुणे ऍड. देविदास काळे, माधव सरपटवार, शारदा ठाकरे, वंदना आवारी, साधना गोहोकर, प्रा. दिलीप अलोणे, प्रमोद वासेकर, अशोक सोनटक्के यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी समाजात फक्त निःस्वार्थ कार्य करतात अशा महिलांचा सत्कार करण्यात आला. नंदा शेलवडे, मंगला झिलपे, भारती सरपटवार यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नृत्य स्पर्धेत चार गट असून प्रथम क्रमांक अ गट योगन्या वासेकर ब गट सुरज धनुष्यकर, पैठणी विजेत्या महिला क गट सुनीता डाबरे, समूह नृत्य मध्ये गोंडी नृत्याला प्राप्त झाले. शेतकरी लॉन चे कार्यवाहक व मानवी हक्क परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष मनीषा सुरेंद्र निबरड यांचा प्रयास संस्थेचे अध्यक्ष पौर्णिमा शिरभाते व त्यांच्या चमूने उत्कृष्ट आयोजना करिता त्यांचा सहपत्नीक सत्कार केला.
स्पर्धेचे परीक्षण नागपूर येथील शुभांगी सरोदे अश्विनी मानेकर,गौरव श्रीरंग यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका कोटनाके, सागर मुने यांनी केले. या स्पर्धेकरिता सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया जय जगन्नाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता पंढरीनाथ सोनटक्के राजु खुसपुरे, सुरेखा वडीचारे सुमित्रा घोडे, प्रिया कोणप्रतिवार, निशा उपरे, जयश्री सोनटक्के,संदीप बेसरकर, राजू धावन्जेवार, वृषाली मुंजेकर, स्नेहल कोटनाके कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.