एकासेवाभावी व गुरूदेव कार्याची मनस्वी आवड असणारे मुख्याध्यापक दिलीप पेचे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास उपस्थित झाल्याचा आनंद – सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील नांदेपेरा येथील पंचशील हायस्कुल या संस्थेचे अध्यक्ष तथा गुरूदेव प्राथमिक शाळा नांदेपेरा शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप जगन्नाथजी पेचे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांचा सपत्नीक सत्कार सोहळा व शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ.जगन्नाथजी पेचे यांची 90 वी जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अ.भा. गुरूदेव सेवा मंडळाचे श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम चे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे हे होते .यावेळी सत्कारमूर्ती श्री दिलीपरावजी पेचे व त्यांच्या अर्धांगिनी, तसेच
सौ विजयाताई दहीकर, श्री मारोतरावजी ठेंगणे, श्री कडुकर, व शाळेचे सन्माननीय संचालक ,माजी मुख्याध्यापक व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव गमे यांचे हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप पेचे व त्यांच्या पत्नी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आदरणीय सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे म्हणाले पेचे परिवारा सोबत आपले जिव्हाळ्याचे समंध असुन श्री दिलीपराव पेचे हे शाळेचे अध्यक्ष असुनही प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक पद अतिशय कुशलतेने सांभाळीत होते.असे गौरवोद्गार त्यांनी काढले.तसेच गुरुकुंज आश्रमात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन.अन्नदान विभागास जमेल तेवढे सहकार्य करावे असे आव्हान सुद्धा त्यांनी केले.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राचार्य श्री पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक तथा वणी तालुका गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी ग्रामगीताचार्य श्री दिलीपराव डाखरे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना या गीताने झाली.