अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून इतिहास, विज्ञान व पर्यावरण जागृतीचा संदेश
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगावचा स्तुत्युउपक्रम
उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
सुरेंद्र इखारे वणी :- मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे महाविद्यालय अशी ओळख आहे. परंतु येथील महाविद्यालयाच्या इतिहास व वाणिज्य विभागाने सहलीच्या माध्यमातून अभ्यास दौरा आयोजित करून विविध स्थळांना भेटी देऊन इतिहास ,विज्ञान व पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला आहे.
आजचा विद्यार्थी हा उद्याचे देशाचे भविष्य असतो असे आपण मानतो म्हणून विद्यार्थ्यावर योग्य संस्कार करणे ही महाविद्यालयाची जबाबदारी असते. हीच बाब लक्षात घेऊन महाविद्यालय नेहमीच विविध सकारात्मक उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांच्या मार्गदर्शनात राबवत असते.
शैक्षणिक सत्र 2024 – 25 मध्ये नुकताच इतिहास विभागाकडून शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी नेहरू सायन्स सेंटर मुंबई, आर्ट गॅलरी मुंबई, हिस्टरी म्युझियम मुंबई, मराठा आरमाराचे मुख्य केंद्र असलेला सिंधुदुर्ग किल्ला, मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग येथील समुद्रकिनारे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे फळ संशोधन केंद्र यासारख्या महत्त्वपूर्ण स्थळांना सुट्टी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना या प्रत्येक स्थळाच्या इतिहासाबद्दल असलेली इतंभूत माहिती देण्यात आली तसेच मानवी जीवनामध्ये या संस्थांचे असलेले योगदान किती महत्त्वाचे आहे याबद्दल सुद्धा सांगण्यात आले. या अभ्यास दौऱ्यामध्ये पर्यावरणा संबंधी जनजागृती राबविणे किती आवश्यक आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून देशाचा होत चाललेला भौतिक विकास सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यासला.या अभ्यास दौऱ्यामध्ये 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. या अभ्यास दौऱ्यामध्ये डॉ. गजानन सोडनर, डॉ. माधुरी तानुरकर, डॉ. प्रवीण कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब देशमुख, डॉ. विभाग घोडखांदे, डॉ. विजय भगत हे सहभागी झाले होते. अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी करिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले