वणी प्रक्षेत्राच्या निवडणुकीत 27 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल
11 संचालकपदासाठी निवडणूक रंगतदार
सुरेन्द्र इखारे वणी :- वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या वणी या सहकारी संस्थेची निवडणूक होऊ घातली आहे ही निवडणूक 7 जून 2025 ला होणार आहे . ही निवडणूक रंगतदार होण्याचे चित्र आहे.
या निवडणुकीसाठी 27 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 27 मे ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 7 जूनला वणी प्रक्षेत्राचे संचालकांचा निकाल आहे. त्यामुळे कमी दिवसात 161 सदस्या पर्यंत उमेदवारांना पोहचावे लागणार आहे . शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने त्यांच्या पर्यंत पोहचणे ही तारेवरची कसरत होणार आहे. कारण ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. यामध्ये सेवानिवृत्त माजी सदस्य पदाधिकाऱ्यांनी संचालक मंडळ आपल्या ताब्यात असले पाहिजे या दृष्टीकोनातून हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकीत जिल्ह्याच्या संचालक मंडळांनी सहभाग घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. दोन पॅनल मध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. आता निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने 27 उमेदवारांपैकी 11 उमेदवार संचालक म्हणून निवडून येणार आहे उमेदवारांमध्ये वंदना शंभरकर महिला प्रतिनिधी, सीमा सोनटक्के महिला प्रतिनिधी, घनश्याम पावडे सर्वसाधारण, संतोष बेलेकार ओबीसी, प्रितेश लखमापुरे ओबीसी, राहुल मानकर सर्वसाधारण, दत्तू महाकुलकार सर्वसाधारण, संजय मडावी अनुसूचित जाती, किशोर बोढे सर्वसाधारण, सुरेन्द्र इखारे भटक्या जमाती, चेतन गोवारदिपे सर्वसाधारण, गणेश लोहे सर्वसाधारण, अश्विनी टेकम महिला प्रतिनिधी गाथा पिपराडे महिला, भुपेंद्र देरकर ओबीसी, अरविंद तिरणकार अनुसूचित जाती, प्रकाश देवाळकर सर्वसाधारण, आत्माराम ताजने सर्वसाधारण, अरुण पहुरकर, नथ्थु जेऊरकर सर्वसाधारण, राजेंद्र देवतळे सर्वसाधारण, विनोद बच्चे भटक्या जमाती, व सर्वसाधारण, राहुल ठेंगणे सर्वसाधारण संतोष चिलकावार सर्वसाधारण असे एकूण 27 उमेदवार मतदार संघातून आहे. दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यामुळे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. 161 सदस्य मतदारांपैकी किती टक्के मतदान होईल यावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे हे दोन्ही पॅनल प्रयत्न करून वणी प्रक्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. या निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी एस डी मडावी पाहणार आहे.