2024-25 ची शून्य असलेली अन्यायकारक संचमान्यता रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य मा श्री सुधाकर अडबाले सर याना शिक्षक प्रसारक समिती वणी यांनी दिले निवेदन
सुरेन्द्र इखारे वणी :- 2024-2025च्या शून्य संचमान्यतेमुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाल्याने शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊन शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल अशी अन्यायकारक संचमान्यता रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले याना देण्यात आले आहे.
2024-2025 च्या संचमान्यतेनुसार शून्य शिक्षक मंजूर झाल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत.
शिक्षक प्रसारक समिती, वणी अंतर्गत वणी,मारेगाव, झरी तालुक्यात दहा शाळा संचालित असून दहा शाळापैकी आदर्श हायस्कूल साखरा(कोलगाव) व आदर्श हायस्कूल साखरा(दरा) येथील शाळेत संचमान्यतेमध्ये शून्य संख्या दिली असून त्यामुळे विद्यार्थ्यी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यासमोर गंभीर समस्या निर्माण झाली असून शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल,तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सुध्दा गंभीर प्रश्न निर्माण होईल.
तरी विद्यार्थ्यी,पालक व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी अन्यायकारक असलेली संचमान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी,याकरिता “विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना”तालुका वणीचे अध्यक्ष श्री. किशोर बोढे व कार्यवाह श्री.दत्तु महाकुलकर यांचे मार्फत लेखी निवेदन अमित वल्लपकर, सुखदेव गोहोगार, अनिल ढेंगळे, देवाजी पाटील, रघुनाथ मोहिते, घाटे सर, सिडाम सर, धुमने सर, सुनील चोपणे, राजेश बोनसुले यांनी दिले.




