Monday, January 12, 2026
Google search engine

सिंदूर मोहीम मधील सैनिकांच्या सन्मानार्थ वणी येथे तिरंगा यात्रा

सिंदूर मोहीम मधील सैनिकांच्या सन्मानार्थ वणी येथे
तिरंगा यात्रा
* सहभागी होण्याचे आवाहन
सुरेंद्र इखारे वणी:–पाकिस्तानी अतिरेक्यांनी दिनांक 22 एप्रिल ला पहेलगाम (जम्मू काश्मीर) येथे सहलीसाठी गेलेल्या 26 निष्पाप लोकांची त्यांचा धर्म विचारुन पत्नी, लहान मुले, आया बहिणी यांच्या समक्ष गोळ्या घालून न्रुशंस हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अभियान राबवून
देश रक्षणासाठी भुदल, नौदल व वायुदल अधिकारी यांनी सिंदूर मोहीम अंतर्गत भारतीय क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करून प्रथम पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर शत्रूचे सैनिक ठिकाणे व एअरबेसेस मातीत मिसळविले.
सिंदूर मोहीमच्या या अभुतपुर्व यशाने सारे जग अचंबित झाले. हे सर्व घडले ते संरक्षण दलातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकारी व सैनिक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण समन्वयाने. त्यांनीच आपल्या भारत मातेचे रक्षण केले आहे. या सैनिकांचे मनोधैर्य, आत्मबळ व शौर्याप्रती क्रुतज्ञतापूर्वक आभार मानून धन्यवाद देण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन दिनांक 22 मे 2025 रोज दुपारी 4.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात येणार आहे.तेव्हा
सर्व देशभक्त भारतवासी एकजुटीने, धर्म पंथ जाती पाती, राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी राष्ट्रभक्त नागरिक या नात्याने तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन आयोजकांनी केले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular