परिवर्तन पॅनल उमेदवारांच्या कार्याचा गौरव आढावा
**परिवर्तन पॅनल: वणी प्रक्षेत्र खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था वणी.*
*🙏निवडणुकीसाठी आवाहन*🙏
वणी प्रतिनिधी :- होऊ घातलेल्या निवडणुकीतील परिवर्तन पॅनल उमेदवाराच्या कार्याचा गौरव आढावा सांगत असताना वणी प्रक्षेत्राच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सविनय सप्रेम नमस्कार!
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, वणी प्रक्षेत्र खाजगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था वणी र. नं. 1152 च्या संचालक मंडळासाठीची निवडणुक
**दिनांक 7 जून 2025 ला होत आहे.** *स्थळ– एस. पी. एम. हायस्कूल, वणी.** * *वेळ –सकाळी 8.00 ते 4.00 वाजेपर्यंत** आपल्या पतसंस्थेच्या हितासाठी आणि आपल्या सर्वांच्या विकासासाठी, **परिवर्तन पॅनल** आपल्यासमोर अत्यंत **दमदार आणि अनुभवी उमेदवारांना** घेऊन येत आहे. हे सर्व उमेदवार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या समस्यांची जाण असलेले, त्यांच्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले आणि आपल्या हक्कांसाठी लढणारे आहेत.**परिवर्तन पॅनलचे कर्तबगार उमेदवार खालीलप्रमाणे आहेत:**
**अ) सर्वसाधारण प्रवर्ग:*** **चेतन गोवारदीपे:** शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कणखर नेतृत्व.* **राहुल ठेंगणे:** विद्यमान संचालक आणि बोर्डा ता. वरोरा येथील सरपंच.* **घनश्याम पावडे:** भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वणी तालुका अध्यक्ष आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कणखर नेतृत्व.* **किशोर बोढे:** वणी तालुका विमाशी संघांचे अध्यक्ष, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी आंदोलनात सक्रिय सहभाग.* **दत्तू महाकुलकर:** समाजसेवक व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विमाशि वणी तालुका कार्यवाह ,व्हॉलीबॉल खेळाडू, गुरुदेव प्रचारक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांसाठी आंदोलनात सक्रिय सहभाग.* **गणेश लोहे:** शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचे तालुकास्तरीय सुलभक म्हणून उत्कृष्ट कार्य. विविध शैक्षणिक-सामाजिक व शालेय स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग.**ब) महिला प्रवर्ग:*** **कु. वंदना शंभरकर:** विमाशीच्या धडाडीच्या सक्रिय कार्यकर्त्या, विविध शालेय उपक्रमांमध्ये सहभाग.* **सौ. सिमा किशोर सोनटक्के:** सांस्कृतिक कार्यामध्ये व क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये विशेष आवड. तालुकास्तरीय विविध स्पर्धेच्या प्रमुख पंच म्हणून कार्य.**क) भटक्या व विमुक्त जाती प्रवर्ग:*** **श्री. सुरेंद्र ईखारे सर:** मुख्याध्यापक व वणी तालुक्यातील आघाडीचे पत्रकार. क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान, विशेषतः कुस्ती या खेळाचे ते उत्कृष्ट खेळाडू आहेत.**ड) इतर मागास प्रवर्ग:*** **श्री. संतोष बेलेकर सर:** माजी वणी तालुका क्रीडा संयोजक. विविध क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग.**इ) अनु. जाती/जमाती प्रवर्ग:*** **संजय मडावी:** शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग. कोणत्याही दबावाला न घाबरता अत्यंत प्रामाणिक व एकनिष्ठपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचे धनी.
या सर्व उमेदवारांमध्ये आपले प्रश्न सोडविण्याची, पतसंस्थेला प्रगतीपथावर नेण्याची आणि आपल्या सर्वांना न्याय मिळवून देण्याची धमक आहे. त्यांच्याकडे अनुभव, दूरदृष्टी आणि प्रामाणिकपणाचे गुण आहेत.**सर्व मतदार शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की, वरील कर्तबगार उमेदवारांच्या ‘विमान ✈️🛩️🛫🛬’ या बोधचिन्हावर फुलीचा शिक्का मारून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि पतसंस्थेच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा!****आपल्या बहुमूल्य मताची आम्हाला अपेक्षा आहे!**
आपला नम्र
प्राचार्य सुधीर वटे परिवर्तन पॅनल ,श्याम बोढे सर, दिवाकर नरुले सर, शैलेश नांदेकर सर






