Saturday, May 16, 2026
Google search engine

आता प्रतिष्ठेची झाली आहे वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक

आता प्रतिष्ठेची झाली आहे वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक

पॅनल प्रमुखांचे ; परिवर्तन पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन

जयंत साठे वणी    :- वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. वणी र. न. 1152 ची निवडणूक 7 जून 2025 ला होऊ घातली आहे. या निवडणुकीत 22 उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत माजी संचालकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. 22 उमेद्वारापैकी 11 उमेदवार संचालक म्हणून निवडून येणार आहे. ही निवडणूक दोन गटात होणार आहे. दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यामुळे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द केलेल्या तारखेस सभासद संख्या 192होती. तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द केलेल्या तारखेस पात्र मतदार 161 आहे. त्यामुळे किती टक्के मतदान होईल, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

या निवडणुकीत वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेला नवी दिशा देण्यासाठी “परिवर्तन पॅनल” हे केवळ एक नाव नसून ते संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी बदलांचे प्रतीक आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनलचे उमेदवार वचनबद्ध आहे.या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून चेतन गोवरदिपे, राहुल ठेंगणे, घनश्याम पावडे, किशोर बोढे, दत्तू महाकुलकर, गणेश लोहे, महिला प्रवर्गातून कु वंदना शंभरकर, सौ सीमा सोनटक्के,अनु.जाती जमाती प्रवर्गातून संजय मडावी, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून सुरेंद्र इखारे तर इमाव प्रवर्गातून संतोष बेलेकार असे एकूण अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. तेव्हा या उमेदवारांना वणी प्रक्षेत्र खाजगी पतसंस्थेच्या सन्माननीय सदस्यांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन परिवर्तन पॅनलचे प्रमुख मुख्याध्यापक सुधीर वटे सर, श्याम बोढे सर, दिवाकर नरुले सर व शैलेश नांदेकर सर यांनी केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular