*वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा प्रारंभ*
सद्गुरू जगन्नाथ बाबा नंदेश्वर देवस्थान येथून नारळ फोडून शुभारंभ.
वणी प्रतिनिधी (ता. ३० मे ) : – वणी प्रक्षेत्र खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची आगामी निवडणूक २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठी पार पडणार असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनलच्या प्रचाराला आज औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ वणी येथील श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू जगन्नाथ बाबा नंदेश्वर देवस्थानात विधिवत पूजा करून व नारळ फोडून करण्यात आला. देवस्थानापासूनच परिवर्तन पॅनलच्या प्रचार यात्रा सुरू झाली.
या प्रचार मोहिमेचे नेतृत्व प्राचार्य सुधीरजी वटे, श्यामजी बोढे, दिवाकरजी नरुले व शैलेशजी नांदेकर यांच्यासह पॅनलमधील उमेदवारांनी केले. प्रारंभिक कार्यक्रमात मुख्याध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, उमेदवार व मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने डोअर टू डोअर प्रचार मोहिमेवर भर दिला असून, सदस्य मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. त्यांना परिवर्तनाची गरज समजावून सांगत, अधिकृत जाहीरनामाही वितरित करण्यात येत आहे.
या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, लढत चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संस्थेच्या भविष्यासाठी परिवर्तन पॅनलच्या रणनीती व कार्यपद्धतीवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






