एअर इंडिया AI 171 विमान अपघातातील प्रवाश्यांच्या नातेवाईकांसाठी मदत कक्ष ( हेल्पडेक्स)
सुरेंद्र इखारे वणी :- अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडिया AI 171 विमानाच्या अपघाताच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्राकडून नागरिकांसाठी मदत आणि माहिती सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
नातेवाईक व प्रभावित नागरिक अधिक माहितीसाठी खलील मदत( हेल्पलाईन)
022-22027990, 022- 22794229,
9321587143, 1070आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क साधू शकता अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालयाचे प्रमुख सतीशकुमार खडके (भा.प्र. से) संचालक यांनी पत्राद्वारे दिली आहे. तेव्हा नागरिकांनी या मदत कार्याचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे.





