Monday, January 12, 2026
Google search engine

लोहार समाज संघटना वणी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

लोहार समाज संघटना वणी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सुरेंद्र इखारे वणी:-
नुकताच उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वणी शहरातील लोहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे
नुसाबाई चोपणे विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी रूपाली प्रविणा दशरथ गिरटकर हिने 90.40 टक्के गुण घेत प्रावीण्य मिळविले आहे तसेच लाॅयंस काॅंव्हेंट चे विद्यार्थी सारांश शितल जयंत गाताडे 74टक्के व अनुष्क शितल जयंत गाताडे 73.60 टक्के घेऊन उत्तीर्ण झाले
लोहार समाज संघटना वणी तर्फे समाजातील या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या गेल्या या अनुषंगाने पालकांनी संघटनेचे आभार मानले आहेत यावेळी बंडू निंदेकर, नितीन धाबेकर, शिरीष क्षिरसागर, जयंत गाताडे, राहुल चट्टे,रवी गाताडे, संदिप  वाघाडे, प्रफुल्ल सोनटक्के, निलेश सोनटक्के,आकाश खंडाळकर व नामदेव गिरटकर व परीवार उपस्थित होता

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular