Tuesday, January 13, 2026
Google search engine

भारतीय स्वयं शिक्षा पद्धती अभ्यासक्रम आता यवतमाळच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात.

भारतीय स्वयं शिक्षा पद्धती अभ्यासक्रम आता यवतमाळच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात.

सुरेंद्र इखारे वणी     :-   राष्ट्रीय शैक्षणिक संसाधन स्वयंंच्या धर्तीवर साध्या सोप्या मराठी भाषेत आणि नि:शुल्क स्वरूपातील विद्यार्थ्यांना थेट प्रेरणादायी ठरणारे अभ्यासक्रम उपलब्ध असावेत या लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या प्राचार्य प्रसाद खानझोडे यांच्या व्यापक भूमिकेतून महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी प्राचीन संस्कृत ग्रंथावर आधारित विविध अभ्यासक्रमांची रचना केली आहे.
जगभरातील हजारो संस्कृत आणि संस्कृती प्रेमी जनतेचा प्रतिसाद लाभत असलेल्या या अभ्यासक्रम मालिकेतील नूतनतम अभ्यासक्रम म्हणजे भारतीय स्वयं शिक्षा पद्धती.
भारतीय ज्ञान परंपरेचा महान स्रोत असणाऱ्या पुराण वाङ्मयापैकी श्रीमद्भागवत पुराणाच्या एकादश स्कंधामध्ये आलेला श्री अवधूत म्हणजे भगवान दत्तात्रेय आणि महाराज यदु यांचा संवाद म्हणजे शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची अस्सल भारतीय दृष्टी.
मी जीवनात सुख,शांती, समाधानाच्या प्राप्तीसाठी २४ गुरु कसे केले? हे सांगताना श्री अवधूतांनी सुरुवातीलाच शिक्षणाचे हे वरील उद्दिष्ट आणि त्या गुरूंच्या माध्यमातून शिक्षणाची नेमकी पद्धती आपल्यासमोर ठेवली आहे.
यामध्ये निसर्गातील तत्त्वांना, पशुपक्षांना गुरु केले असल्यामुळे त्यांनी शिकवले ! या वाक्यापेक्षा मी त्यांच्याकडून हे गुण शिकलो ! ही गुणग्रहणात्मक स्वरूपाची शिक्षणाची खरी स्वयं शिक्षा पद्धती यात अधोरेखित करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाने सुचविलेल्या या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने जिओईसी स्वरूपात मान्यता दिली असून शिक्षण शास्त्राशी संबंधित हा अभ्यासक्रम, हा भारतीय दृष्टिकोन भावी अध्यापकांना उपलब्ध व्हावा या दृष्टीने लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ येथील प्राचार्य डॉ. सुहासकुमार पाटील यांच्या स्वाक्षरीने संपन्न झालेल्या सामंजस्य करारानुसार आता हा अभ्यासक्रम या शैक्षणिक सत्रा पासून शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. https://drive.google.com/file/d/1NfoYmfL6sgWr3i_wJX6zaPJTFnhW3sMJ/view?usp=sharing
या लिंकच्या आधारे संपूर्णतः ऑनलाइन आणि पूर्णपणे निःशुल्क असणाऱ्या या अभ्यासक्रमाचा लाभ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येकच व्यक्तिमत्त्वाने देखील घ्यावा असे आवाहन शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular