Saturday, May 16, 2026
Google search engine

एसबी लाँन वणी येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न

 एसबी लाँन वणी येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न

सुरेंद्र इखारे वणी :-   भारत स्वाभीमान, महिला पतंजली योग समिती यांचे वतीने अकरावा आंतरराष्ट्रीय योगदिन एसबी लाँन वणी येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांने संपन्न झाला.यावेळी मा.श्री.संजीवरेड्डी बोदकुरवार माजी आमदार व मा.किरणताई देरकर अध्यक्ष श्रीशक्ती फाॅऊंडेशन वणी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रोटोकाँलनुसार प्रार्थना, शरीर संचलन,विविध प्रकारची 15 आसने, कपालभाती , विविध प्राणायाम, ध्यान घेण्यात आले.यावेळी प्रास्तावीकेतुन शासनाच्या दहा कार्यक्रमाची माहिती देऊन प्रा.महादेव खाडे यांनी योग दिनाच्या प्रोटोकॉल नुसार कार्यक्रमाचे संचालन केले तर योग शिक्षक श्री.लक्ष्मण इद्दे,श्री.रमेश बोबडे,श्री.जयप्रकाश राजुरकर सौ.मायाताई माटे,सौ.विद्याताई दहेकर,सौ.वनिता क्षिरसागर ई. यांनी आदर्श प्रात्यक्षीक करून दाखविले व त्यानुसार उपस्थित योगसाधकांनी प्रात्यक्षिक केले.यावेळी झालेल्या योग दिन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सौ.ममता श्रीवास्तव ,सौ.कुंदा सावसाकडे व सौ.माया माटे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली महिलांनी देशप्रेम ,सिंदुर ऑपरेशन ई वर आधारीत योगन्रुत्य सादर केले.तर सौ.रेखा बोबडे व सौ.सुषमा मोहितकर यांनी *साॅसो क्या भरोसा* हे मार्मिक गीत गायन केले.
संकल्प वाचन श्री.दिगंबरराव गोहोकर यांनी करुन श्री.वसंतराव उपरे यांनी शांतीपाठ घेतला.
उदघाटन कार्यक्रमाचे संचलन सौ.स्वप्ना पावडे यांनी केले व आभारप्रदर्शन श्री.नामदेवराव जेनेकर यांनी केले.
यावेळी योग दिन कार्यक्रमास हजर राहुन वणी शहरातील अनेक योगसाधक व विद्यार्थी यांनी यांचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियमित सर्व योग शिक्षक व योग साधकांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular