Saturday, May 16, 2026
Google search engine

डॉ. स्वानंद गजानन पुंड यांना शारदा पुरस्कार घोषित

डॉ. स्वानंद गजानन पुंड यांना शारदा पुरस्कार घोषित.

सुरेंद्र इखारे वणी   :- पुणे येथील ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्राच्या माध्यमातून भारतीय संस्कृती या विषयावर प्रदीर्घ काळ, वैशिष्ट्यपूर्ण कार्य साकारणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला दिला जाणारा शारदा पुरस्कार यावर्षी विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांना घोषित झालेला आहे.
श्री गणेश पर ग्रंथांच्या सुवर्ण महोत्सवासह ८४ ग्रंथ, ५५०० वर लेख, ५००० वर व्याख्यान- प्रवचने, दोन यूट्यूब चैनल वरील जगभरातील हजारो संस्कृत आणि संस्कृती प्रेमींच्या नित्य प्रतिसादाने संपन्न शेकडो व्हिडिओ, वेगवेगळ्या पाच विक्रम ग्रंथांमध्ये नोंदवलेले पाच विक्रमी उपक्रम, तीस पेक्षा अधिक मान्यवर संस्थांचे पुरस्कार अशा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यासाठी त्यांना घोषित या पुरस्काराच्या निमित्ताने प्रथमच विदर्भ प्रांताला हा सन्मान प्राप्त होत आहे हे विशेष उल्लेखनीय.
२९ जून २०२५ रोजी पुणे येथील पद्मावती विभागात असणाऱ्या विनकर सभागृहात आयोजित या वैशिष्ट्यपूर्ण सन्मान सोहळ्यात अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या संस्थेचे दाते पंचांग कर्ते श्री मोहनजी दाते, वेदमूर्ती दत्तात्रय साधले, शुभांगी पांगारकर यांच्यासह योगीराज वेद विज्ञान आश्रम या संस्थेच्या श्री चैतन्य काळे गुरुजी या दिग्गज मंडळींना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. सोबतच वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी संचालित ज्योतिष वास्तू विश्वास संशोधन केंद्राच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांमध्ये देदीप्यमान यश प्राप्त केलेल्या ज्योतिष आणि वास्तु शास्त्राच्या अभ्यासाकांना देखील गौरविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular