Wednesday, November 12, 2025
Google search engine

आदर्श विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम.

आदर्श विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम.
सुरेंद्र इखारे वणी   :-  येथील आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहोकर रंगमंचावर विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची जाणीव रुजावी, वृक्षप्रती प्रेम वाढावे या उद्देशाने शनिवारी एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबविण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक रोपटं लाऊन, त्याची जोपासना व संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. याप्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नोटबुकाचे वितरण करण्यात आले.
सद्यस्थितीत बदलत्या हवामान बदलाचा परिणाम सजीवसृष्टीसह अन्य क्षेत्रावरही होत आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड महत्त्वाची मानली जातआहे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल म्हणूनच एक पेड माँ के नाम हे जागतिक अभियान एक जनचळवळ असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा महादेव खाडे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक समिती वणीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकार उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा महादेव खाडे, विशेष अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक समिती वणीचे सहसचिव महादेवराव वल्लपकर, अतिथी म्हणून प्राचार्य आर एल मोहिते, पर्यवेक्षक एस आर पिदुरकर, पालक प्रतिनिधी म्हणून सतीश शुक्ला, मोहन वाईकर उपस्थित होते. तरफिया शेख, आकांक्षा धोबे, शिक्षक बाबाराव कुचनकर यांनी मनोगत व्यक्त केले. एक पेड माँ के नाम या उपक्रमात राधिका पिंपळकर, शाईन शेख, सुनीता महापुरे, शबाना शेख, रीना वाईकर, ज्योती ऊइके, सुषमा धांडे, माया महापुरे, गुलाफाबाई शाहू इत्यादी आईंनी सहभाग घेतला. राष्ट्रवंदनेनी कार्यक्रमाची सांगता झाली .
संचालन वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक एस आर पिदुरकर तर आभार अलका साळवे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular