राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत श्वेता उईके चे सुयश.
सुरेंद्र इखारे वणी :- येथील आदर्श हायस्कूलची विद्यार्थिनी कु श्वेता ऊईके हिने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुयश संपादन केले.
समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तिने तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेसाठी निबंधाचा विषय ( युद्ध की बुध्द)हा देण्यात आला. श्वेताने आपल्या प्रभावी लेखणीतून आणि नाविन्यपूर्ण विचारातून परिक्षकांची मने जिंकली. क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित यवतमाळ येथील समता पर्व समारोपीय कार्यक्रमात स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत श्वेताचा गौरव करण्यात आला. वैजनाथ खडसे यांनी तिला मार्गदर्शन केले . तिने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाला दिले . या दैदिप्यमान यशाबद्दल शि प्र समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकर, सहसचिव महादेवराव वल्लपकर , माजी प्राचार्य आर एल मोहिते, पर्यवेक्षक एस आर पिदुरकर , शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून श्वेतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




