Tuesday, April 21, 2026
Google search engine

वणी तालुक्याच्या  जुगात आणि आपटी गावाजवळील परिसरात  अतिशय दुर्मिळ जीवाश्मे 

 वणी तालुक्याच्या  जुगात आणि आपटी गावाजवळील परिसरात  अतिशय दुर्मिळ जीवाश्मे 

मागील वर्षी हत्ती तर ह्या वर्षी बायसन , हरिन, काही मानवाचे, अश्मयुगीन अवजारे सुद्धा आढळली*

*प्रा सुरेश चोपणे*
भूशास्त्र आणि पुरातत्व संशोधक, चंद्रपूर

————————–
सुरेंद्र इखारे वणी   :–   गेल्या वर्षापासून आतापर्यंत प्रा सुरेश चोपणे ह्यांनी संशोधन केले असता त्यांना वर्धा नदीच्या किनारी आपटी आणि जुगात गावा जवळ महाराष्ट्रात प्रथमताच हत्ती सोबतच बायसन,हरिण,डुक्कर आणि मानवी अल्प जीवाश्मे तसेच सोबत पाषाण युगिन अवजारे सापडली आहेत.ही शेवटच्या हिमयुगीन, प्लेइस्टेसीन काळातील २०,००० वर्षे दरम्यान ची अतिशय नवीन प्राण्यांची जीवाश्मे असल्याची महत्वाची माहिती प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे.

*संशोधित प्राणी*

आजपर्यंत भूशास्त्र विभागाला सुद्धा अशी जीवाश्म महाराष्ट्रात आढळली नसून ती केवळ प्रा सुरेश चोपणे ह्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शोधून काढली आहेत.वर्धा नदीजवळ आढळलेल्या प्राण्यात जास्त प्रमाणात बायसन जीवाश्म आढळले. कमी प्रमाणात वाईल्ड बोअर चे दात,हरिनाचे हाड,मानवाच्या पाषाण युगीन अवजारां सोबत काही मानवाची आणि प्राण्यांची हाडे मिळाली असून ती सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये सुरक्षीत ठेवली आहेत.

*पाषाण युगिन मानव आणि वन्यजीवांचा संबंध*
पाषाण यूगिन मानवांची अवजारे सुद्धा ह्या अलीकडील प्राण्यांच्या जवळच आढळली असून मानव त्यांची शिकार करीत होते हे सिद्ध होते.२०,००० वर्षा दरम्यान जगात हिमयुग होते, त्यानंतर ते तापमाना मुळे वितळले आणि प्रचंड महापूर आला. ह्याच महापुरात विदर्भ आणि वणी जवळील सर्व प्राणी नदीत वाहून गेले आणि गाळात गाडले गेले. काही हजार वर्षानंतर त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले.
वर्धा नदीच्या वणी ,मारेगाव,वरोरा आणि चंद्रपूर तालुक्यातच काही ठिकाणी नदीत वाहून आलेला गाळ, रेती आणि दगड आढळतात आणि ह्याच ठिकाणी प्रा सुरेश चोपणे ह्यांना हत्ती आणि इतर प्राण्यांची जीवाश्मे सापडली आहेत. भूशास्त्र विभागाला अजूनही असे जीवाष्मे चंद्रपूर जिल्ह्यात आढळली नाही.

*वणी तालुक्यात विविध प्राण्यांची जीवाश्म सापडली*

वणी तालुका हा भूशास्त्राच्या आणि जीवाश्माच्या बाबतीत देशात ,महाराष्ट्रात सर्वाधिक महत्वाचा जिल्हा आणि भूशास्त्रीय संग्रहालय मानल्या जाते. इथे प्रा चोपणे ह्यांनी महत्त्वाची जीवाश्म शोधली त्यात २०० कोटी ते २०,००० हजार वर्षांपर्यंतचे जीवाश्म आढळते. ह्यातील १५० कोट्यावधी वर्षाचे स्ट्रोमॅटोलाईट,२० कोटी वर्षाचे वृक्ष आणि पानांचे जीवाश्म,६ कोटी वर्षाची डायनासोर, झरी तालुक्यात वृक्ष, शंख – शिंपले तर जुगात जवळ अगदी अलीकडील २०,००० वर्षाच्या हत्ती चे जीवाश्म आहेत.
अलीकडील प्राण्यांचे जीवाश्म भारतात क्वचितच आढळली आहेत. देशात प्रथमतःच अशी जीवाश्म चंद्रपूर शहराजवळ सापडली परंतु शासकीय संग्रहालयाची अत्यंत गरज असल्याची आवाहन प्रा सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.

*प्रा सुरेश चोपणे ह्यांची विविध संशोधने*

प्रा सुरेश चोपणे हे १९९५ पासून भूशास्त्रीय संशोधन करीत आहेत. ह्यांना चार वर्षांपूर्वी चंद्रपूर आणि वणी येथे पृथ्वीवरील १५० कोटी वर्षा पूर्वीचे पहिले स्त्रोमाटोलाइट हे जीवाश्म शोधून काढले.२५ वर्षापूर्वी ६ कोटी वर्षाची डायनासोर, शंख शिंपले,१५ कोटी वर्षा दरम्यान ची वृक्ष,पाने शोधून काढली.तर शंख शिंपले आणि विविध जीवाश्म स्थळे शोधून काढली आहेत.
मागील आणि ह्या वर्षी प्रा चोपणे ह्यांना विविध प्राण्यांची बायसन , म्हशी, डुक्कर, हरिण आणि इतर अनोळखी प्राण्यांची जीवाश्म त्यांच्या संग्रहालयात जतन करून ठेवली आहेत.असे प्राणी सापडणे हे वणी, यवतमाळ साठी खूप महत्वाचे मानले जाते कारण ही नवीन जीवाश्म भूशास्त्र विभागाला सुद्धा सापडली नाही. सर्व अभ्यासक, विद्यार्थी ह्यांनी अशा प्राचीन जीवाश्माना निश्चित पाहिले पाहिजे , त्यांना सुरक्षीत ठेवण्यासाठी शासकीय संग्रहालय स्थापन झाले पाहिजे, असा प्रयत्न न झाल्याने प्रा सुरेश चोपणे ह्यांनी विसापूर येथे बोटनीकल गार्डन मध्ये स्वतःच्या प्रयत्नाने भौगोलिक संग्रहालय करण्यास मदत केली आहे असे प्रा सुरेश चोपणे ह्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular