Saturday, May 16, 2026
Google search engine

वणी येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 8 चे नामवंत मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन

वणी येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 8 चे नामवंत मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार यांचे अपघाती निधन

सेवाभावी,निःस्वार्थी व सच्चसमाजसेवक काळाच्या पडद्याआड

सुरेंद्र इखारे वणी:-   येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 8 चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित असलेले दिलीप नारायणराव कोरपेनवार यांचे56 व्या वर्षी आज दिनांक 20 जुलै 2025 रोज रविवारला पहाटेच्या सुमारास वरोरा- चिमूर मार्गावरील रान तळोदी शिवारात अपघाती निधन झाले.

कोरपेनवार सर कामानिमित्त वणीवरून मालवाहू पिकअप वाहन क्रमांक एम एच 49 डी 4431 ने वरोरा- चिमूर मार्गाने जात असताना त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकर क्रमांक एम एच 34 बीजे 6445 या वाहनाने जबर धडक दिली. ही धडक पॅसेंजर साईडला असल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. व त्यांची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या पिकअप वाहनात तिघेजण होते त्यामध्ये दिलीप कोरपेनवार सर, क्लिनर, व वाहन चालक होते . सरांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने शिक्षण क्षेत्रात कामकरणारे, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचे चाहत्यांनी वरोरा येथे धाव घेतली.  वणी येथील नगर परिषद शाळा क्रमांक 8 चे मुख्याध्यापकच नव्हे तर ते वृक्षप्रेमी, सामाजिक सदभावनेचे मूर्ती होती .त्यांनी संपूर्ण वणी शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली असून परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व सुद्धा स्वीकारले आहे. त्यांचा नेहमी अनेक उपक्रमामध्ये सहभाग असायचा व ते जातीने पुढाकार घेऊन हाती घेतलेले कार्य पूर्ण करायचे अशी ख्यातनाम व्यक्ती होती.त्यांचे मूळ गाव झरीजामनी तालुक्यातील अर्धवन येथील परंतु गेल्या 25- 30 वर्षांपासून वणी येथे वास्तव्यास आहे .  परंतु त्यांच्या अकस्मात अपघाती निधनामुळे संपूर्ण वणी शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाठीमागे वडील नारायणराव कोरपेनवार, मोठे दोनभाऊ, त्यांची पत्नी,एक मुलगा ,एक मुलगी असा मोठा आप्तपरिवार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular