यूजीसी नेट पास केल्याने निवृत्त न्यायाधीश परसराम पाटील यांचे अभिनंदन
नागपूर ( जयंत साठे) सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश परसराम गोमाजी पाटील यांनी वयाच्या 68 व्या वर्षी पालीमध्ये यूजीसी नेट परीक्षा पास केली. ते पीएचडी साठी क्वालिफाईड झाल्याने बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन ने त्यांचे अभिनंदन केले आहे.
परसराम पाटील हे जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी पाली, बुद्धिस्ट स्टडी व आंबेडकर विचारधारा आदि तीन विषयात एम ए केले. पीएचडी करण्यासाठी त्यांनी ही पाली मध्ये यूजीसी नेट ची परीक्षा दिली होती. काल याचा निकाल लागला असून त्यांनी ही परीक्षा चांगल्या मार्काने पास केली.परसराम पाटील यांनी आपल्या वयाच्या 68 व्या वर्षी पाली विषयाची यूजीसी नेट ही प्रतिष्ठेची परीक्षा पास केल्याने त्यांचे अभिनंदन त्यांचे सहकारी विद्यार्थी मित्र उत्तम शेवडे, भिक्खु महेंद्र कौसल, नरेश मेश्राम, जयंत साठे, सिद्धार्थ फोपरे, दिलीप गायकवाड, शामराव हाडके, सखाराम मंडपे, विजय जांगडेकर, डॉ सतीश नगराळे, मोरेश्वर मंडपे, डॉ वासुदेव बारसागडे, ऍड विजय धांडे, सुनील लांडे, किशोर भैसारे, एड अवधूत मानवटकर, एड विलास राऊत, एड लालदेव नंदेश्वर, महानाग रत्न, विजय वासनिक, किशोर रामटेके, हिरालाल मेश्राम, संजय खोब्रागडे, कैलास घोडेश्वर, पुष्पा ढाबरे, रंजना ढोरे, तनुजा लामसोगे आदींनी अभिनंदन केले आहे.




