डॉ. करमसिंग राजपूत यांची दोन पुस्तके अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ
सुरेंद्र इखारे वणी :- शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत तथा महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे संयोजक डॉ. करमसिंग राजपूत यांनी लिहिलेली स्थूल अर्थशास्त्र तथा मुद्रा उत्पन्न आणि रोजगार ही दोन पुस्तके संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अनुक्रमे मेजर आणि मायनर अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथरूपात प्रकाशित झाले आहेत.
नागपूर येथील साई ज्योती या प्रकाशन संस्थेत द्वारा या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले असून या निमित्ताने आजपर्यंत डॉ. करमसिंग राजपूत यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या १३ वर पोचलेली आहे हे विशेष उल्लेखनीय.
विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि अर्थशास्त्रा विषयी रुची असणाऱ्या नागरिकांनी देखील या पुस्तकांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाशनाच्या वतीने करण्यात येत आहे.





