Tuesday, January 13, 2026
Google search engine

चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ची
वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सुरेंद्र इखारे वणी    :- चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 27 जुलैला जेष्ठ नागरिक भवनात संपन्न झाली.या सभेचे अध्यक्ष श्री.उदयराव गोहोकार तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.गणेश किंद्रे उपविभागीय पोलिस अधिकारी वणी,सौ.आशाताई जुनघरी सरपंच ग्रामपंचायत गणेशपूर,प्रा.महादेवराव खाडे अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद वणी,प्रा.शंकरराव व-हाटे संचालक वसंत जीनिंग वणी,श्री.भैय्याजी खाडे अध्यक्ष नवभारत हायस्कूल उकणी ई. होते.
सर्वप्रथम मागील वर्षी दिवंगत झालेल्या पाच सदस्यांच्या कार्याचा गुणगौरव करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविक व मागील वर्षी झालेल्या सर्व साधारण सभेचे अहवाल वाचन श्री.रामदासजी बोढे सचीव यांनी केले तर जमाखर्च अहवाल वाचन कोषाध्यक्ष श्री.सुभाष आत्राम यांनी केले.वयाची अंशी वर्ष पुर्ण करणारे अति जेष्ठ नागरिक श्री.मणिराम ठावरी,श्री.गणपतराव रासेकर,व श्री.मोहनराव वरारकर, श्री.मनोहरराव भांडारकर यांचा पुष्पगुच्छ,शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री.मणीराम ठावरी यांनी अती जेष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार केल्या बद्दल मंडळाचे आभार मानले.श्री.गणेश किंद्रे ,सौ.आशाताई जुनघरी,श्री.भैयाजी खाडे,प्रा.महादेव खाडे, प्रा.शंकरराव व-हाटे यांनी सभेला मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषनातुन श्री.उदयराव गोहोकार यांनी मंडळाची वाटचाल, कार्यपद्धती व फेस्काॅमची संलग्नता ई.बाबत मार्गदर्शन केले.
बहारदार संचलन श्री.नाना विधाते यांनी करुन आभार प्रदर्शन श्री.लक्ष्मण इद्दे यांनी केले.शेवटी पसायदान घेऊन समारोप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.महादेवराव खंगार, श्री.भास्करराव खारकर,श्री.गुलाबराव निते,श्री.सौरभ बोढे श्री.संदीप डहाके,सौ.छाया लिचोडे ई नी सहकार्य केले.या सभेला 70 जेष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular