Friday, April 17, 2026
Google search engine

गणेशपुर येथील जेष्ठ नागरिक भवन येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 

 गणेशपुर येथील जेष्ठ नागरिक भवन येथे 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 
.
सुरेंद्र इखारे वणी  :- वणी तालुक्यातील गणेशपुर येथील चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशिय मंडळ व ग्रामवाचनालय गणेशपूर चे वतीने जेष्ठ नागरिक भवन गणेशपूर येथे 79वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गणेशपुर येथे जेष्ठ नागरिक भवनाच्या पटांगणात चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री.उदयराव गोहोकार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी श्री.वसंतराव उपरे यांनी ध्वजगीत गायन केले तसेच श्री.अशोकराव चौधरी यांनी मधुर स्वरात ऐ मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत म्हटले.
यानंतर जेष्ठ नागरिक भवनात आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्षस्थानी  श्री.उदयराव गोहोकार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.पांडुरंग व-हाटे , सेवानिवृत्त प्राचार्य श्री.नितीन मोहितकार व  सेवा मंडळाचे कार्यकर्ते श्री. विनायक बोबडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना  श्री.पांडुरंग व-हाटे यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून त्याचे जतन करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे असे सांगितले तर श्री.विनायक बोबडे यांनी देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी आपण व सर्व मुलांनी थोर स्वातंत्र्यसेनानी,थोर पुरुष यांच्या पुस्तकाचे वाचन करण्याची गरज आहे असे म्हणाले तर श्री नितीन मोहितकार यांनी अहिंसक मार्गाने स्वांतत्र्य मीळवून देणारे महात्मा गांधी यांच्या चरित्राचा अभ्यास भारता प्रमाणेच जगभरातील जनता करीत आहेत याबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात श्री.उदयराव गोहोकार यांनी मंडळाच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन सर्व उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतुन जेष्ठ नागरिक मंडळाच्या आयस्काम व फेस्काम बाबत माहिती श्री.रामदास बोढे सचीव यांनी दिली.
नियोजनबद्ध संचलन श्री.नाना विधाते सर यांनी केले तर आभार  श्री.लक्ष्मण इद्दे यांनी मानले.या कार्यक्रमास 65 जेष्ठ नागरिक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे  यशस्वीतेसाठी   श्री.गुलाबराव निते,महादेवराव खंगार,भास्करराव खारकर,श्री.जगदीश ठावरी,सौ.छाया लिचोडे ग्रंथपाल यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular