Tuesday, March 10, 2026
Google search engine

आदर्श हायस्कुलची विद्यार्थिनी तरफिया शेख  वकृत्व स्पर्धेत प्रथम  

वणीच्या आदर्श हायस्कुलची विद्यार्थिनी तरफिया शेख  वकृत्व स्पर्धेत प्रथम  
सुरेंद्र इखारे वणी:-    शहरातील वाघोबा खंडोबा देवस्थान सभागृहात  स्वातंत्रदिनानिमित्य आणि ग्रामगीताचार्य नारायण मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत  शालेय गट वर्ग सहा ते दहा मध्ये लोकमाता अहिल्याराणी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य आणि खुला गट मध्ये ओबीसी व्हीजे एन टी  व एस बी सी च्या उज्वल भवितव्यासाठी ओबीसी जातनिहाय जनगणना आजची गरज या विषयावर झालेल्या वकृत्व स्पर्धेत आदर्श हायस्कूलने दैदिप्यमान यश प्राप्त केले. लोकमाता अहिल्याराणी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य या विषयावर आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी कु तरफिया शेख हिने आपले अप्रतिम विचार मांडले. त्यांच्या विचारांनी उपस्थित श्रोत्यांना आणि परीक्षक नामदेव जेणेकर,प्रा विजय बोबडे, लक्ष्मण इदे यांना प्रभावित केले व शालेय गटातून पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. त्यामुळे तिला रोख रक्कम दोन हजार रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन कापूस उत्पादन पणन महासंघ मुंबई चे संचालक संजय खाडे यांच्या हस्ते प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सानिया मेश्राम यांना प्रोत्साहन पुरस्काराने गौरविण्यात आले तर श्वेता उइके चा प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना वेळोवेळी सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी मार्गदर्शन करणारे ग्रामगीताचार्य तथा उपक्रमशील शिक्षक वैजनाथ खडसे यांनी खुला गटामध्ये अभ्यासपूर्ण व सखोल वकृत्व सादर करून प्रोत्साहनपर प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. रोख रक्कम सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक यांनी दैदिप्यमान व अप्रतिम कामगिरी करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली या यशाबद्दल शिक्षण प्रसारक समिती वणीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंगराव गोहोकार, सहसचिव महादेवराव वल्लपकर, प्राचार्य आर एल मोहिते, पर्यवेक्षक एस आर पिदुरकर, वरिष्ठ लिपिक अमित वल्लपकर, बाबाराव कुचनकर, विद्या आत्राम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular