Saturday, May 16, 2026
Google search engine

पीपल्स रिपब्लिकन पार्टीची विभागीय बैठक संपन्न

पीपल्स रिपब्लिकन पार्टीची विभागीय बैठक संपन्न
: जयंत साठे नागपूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय मंथन बैठक विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा धामणगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेवराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे घेण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीला तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना देखील उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवनियुक्त तालुका अध्यक्ष अरुण माहुरे जिल्हा संघटक जानराव वाटाणे, दिगंबर लाडे , गोपाल रूपने, मुकुंद भगत, रणधीर खडसे, हरिभाऊ अंभोरे, विठ्ठलराव गावंडे , भारतसिंग मोहोड ,मोहन देवरे, रोशन मोहोड, निलेश पारवे, गौतम डांगे, पंडित मंडोदरे, गोवर्धन नाईक यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .बैठकीमध्ये नागपूर येथे 16 ऑगस्ट रोजी धम्म सभेप्रसंगी ज्या महाबोधी महाविहार आंदोलनाला विरोध करणाऱ्या  लोकांनी आदरणीय प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या भाषणादरम्यान नारेबाजी करून गोंधळ घातला अशा महाबोधी आंदोलनद्रोही लोकांच्या निंदनीय कृतीचा बैठकीमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular