Tuesday, January 13, 2026
Google search engine

आदर्श विद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूची निर्मिती उपक्रम

आदर्श विद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूची निर्मिती उपक्रम.
सुरेंद्र इखारे वणी :- येथील आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहोकर रंगमंचावर आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूची निर्मिती करणे हा उपक्रम राबविण्यात आला. नमस्कार माझा या ध्यानमंदिरा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सद्यपरिस्थितीचा विचार करता टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्माण करणे आवश्यक आहे. विशेषतः थर्माकोल व पातळ प्लास्टिक कॅरिबाग यांचे विघटन होत नाही. व जनावरांनी ते खाल्यास त्यांची रवंथ प्रक्रिया बिघडते. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर कमी करणे व केल्यास त्याचा पुनर्वापर करून योग्य ती समाजोपयोगी कशी निर्माण करता येईल तसेच थर्माकोलचे विघटन करून मानवाला उपयुक्त पडणाऱ्या वस्तूची निर्मिती कशी करता येईल याबाबत विवेकानंद विद्यालय नेरड येथील सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक विजय गंधेवार यांनी उद्बोधन केले . ते आदर्श हायस्कूल येथे आयोजित मार्गदर्शन करतांना बोलत होते. या उपक्रमातून बौद्धिक कल्पकता, सर्जनशीलता, नवन्मेश , रचनात्मक प्रक्रिया करण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एल मोहिते उपस्थित होते . अतिथी म्हणून पर्यवेक्षक एस आर पिदुरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन वैजनाथ खडसे यांनी केले. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular