Monday, January 12, 2026
Google search engine

लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टद्वारे स्त्री कॅन्सर तपासणी  शिबिर संपन्न

लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टद्वारे स्त्री कॅन्सर तपासणी  शिबिर संपन्न

ग्रामीण व शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरेंद्र इखारे वणी :
लायन्स क्लब वणी, वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, नार्ची नागपूर चॅप्टर मेनोपाज सोसायटी नागपूर आणि असोसिएशन ऑफ सर्जन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स स्कूल, देशमुखवाडी, वणी येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी महिलांसाठी कॅन्सर तपासणी व निदान निःशुल्क शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले मंचावर डॉ निर्मला वझे, लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला, सचिव प्रा अभिजीत अणे,सुधीर दामले, सौ मंजिरी दामले व डॉ विद्या सुतवणेउपस्थित होते.”कॅन्सर सारख्या आजाराचे वेळीच निदान झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्याचा आमचा हा प्रयत्न व त्या दिशेने एक पाऊल आहे” असे मनोगत श्री बोदकुरवार यांनी व्यक्त केले. तसेच डॉ निर्मला वझे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरात नागपूर येथील नामांकित डॉक्टर डॉ. निर्मला वझे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. विद्या सुतवणे डॉ पारुल सावजी, डॉ. प्राची उईके डॉ उज्ज्वला देशमुख डॉ भावना पांडा, डॉ वैष्णवी वानखेडे, डॉ सीमा बिस्वास, डॉ शरयू वानखेडे, ऋतुजा रुईकर, डॉ मानसी ठाकरे, डॉ प्राजक्ता बरडे, तसेच स्थानिक डॉ डॉ पल्लवी, डॉ सोनू शेडामे, डॉ प्रणाली पावडे, डॉ श्वेता ठाकरे, डॉ जयश्री एकरे, व डॉ प्रद्या महाजन आणि तज्ज्ञांचे पथक उपस्थित होते. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश होता. शिबिरात स्तन कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी १७ पॅप स्मीअर ,४२ कल्पोस्कोपी चाचणी व १४१ महिलांची हिमोग्लोबीन यांसारख्या महत्त्वपूर्ण तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय, डॉ पूजा सावजी महिलांना यांनी कॅन्सरच्या लक्षणांबाबत आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरात वणी आणि परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. १४१ महिलांनी तपासणीचा लाभ घेतला व निवडक नमुने पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले.यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा मोठा सहभाग होता. काही महिलांनी प्रथमच कॅन्सर तपासणी केली आणि त्यांना याबाबत माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले. नागरिकांनी लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले . विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना वैद्यकीय सुविधांपर्यंत मिळणे कठीण असते, त्यामुळे अशा शिबिरांचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले.

शिबिराला लायन राजाभाऊ पाथ्रडकर, लायन किशन चौधरी, लायन बलदेव खुंगर, लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन महेन्द्र श्रीवास्तव, लायन डॉ विजय राठोड, लायन नंदलाल शुगवाणी, लायन प्रमोद देशमुख,लायन सौ. सुनीता खुंगर, लायन वीणा खोब्रागडे, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमांत नागपूर व स्थानिक तज्ञ डॉक्टर तसेच मदतनीस व नर्स यांना अतीथींच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ मंजिरी दामले यांनी केले संचालन व आभार लायन अभिजीत अणे यांनी मानले. लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular