लोकमान्य टिळक महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न.
सुरेंद्र इखारे वणी :- विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्वाची जाणीव जागृत आणि विकसित करीत आपल्याला शक्य त्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी प्रोत्साहित करावे या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि योगा मेडिटेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. मानस कुमार गुप्ता उपस्थित होते. व्यासपीठावर औषधी निर्माण शास्त्र विभागाचे प्राचार्य सुधाकर रेड्डी, जी. एम. सी चंद्रपूरचे डॉ .अनिल मुजगेवार आणि डॉ.ललित घोगरे यांच्यासह डॉ. अभिजित अणे, प्रा . प्रफुल्ल कोसे डॉ. आदित्य शेंडे, प्रा. किसन घोगरे, प्रा. उमेश व्यास हे विविध विभागाचे संयोजक उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले.
डॉ. अनिल मुजगेवार यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट करून या विषयात अनेकांच्या मनात असणाऱ्या गैरसमजांना दूर केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाचे कौतुक करीत डॉ. मानस कुमार गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.
जयसिंग डोंगरे ,योगिता माळी ,सौ सोनी, गायत्री
,सुनील चंदनखेडे,अपेक्षा शिंगाडे
साहिल उखारे,चेतन या वैद्यकीय चमुने यावेळी रक्तसंग्रहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास जुनगरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले. गणेश आसुटकर आणि नितीन शिंदे सोबतच संजय बिलोरिया यांचे विशेष सहकार्य लाभले , यावेळी महाविद्यालयाच्या तब्बल ४९ आजी माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान केले हे विशेष उल्लेखनीय.




