Monday, April 20, 2026
Google search engine

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील निवास स्थानाचे राष्ट्रीय स्मारकबाबत काष्ट्राईब महासंघासोबत मंत्र्यांची बैठक संपन्न

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील निवास स्थानाचे राष्ट्रीय स्मारकबाबत काष्ट्राईब महासंघासोबत मंत्र्यांची बैठक संपन्न
मुंबई (जयंत साठे) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथे वास्तव्य असलेले जिथून बाबासाहेब लहानपणी शाळेत जायचे ते दत्त निवास बंगला नं 1,सदर बाजार, सातारा येथिल जागेवर राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी मंगळवार दि 23/9/2025रोजी दुपारी 2.00वाजता मंत्रालय मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचे अध्यक्षतेखाली, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रमुख उपस्थित व अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ यांचे नेतृत्वात आयोजित करण्यात आली. या बैठकीला, अपर मुख्य सचिव महसूल विभाग, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग, आयुक्त समाज कल्याण, सहसचिव व उपसचिव सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी सातारा, भुमापन अधिकारी सातारा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर समता व न्यायासाठीलढा दिला. भारतातील कोट्यावधी शोषित जनतेला जगण्याचा अधिकार दिला अशा महमानवाचे विचार पुढच्या पिढीला समजून घेण्यासाठी शासनाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिथे जिथे वास्तव्यास होते ते सर्व शोधून ते सर्व ठिकाण व वास्तू जतन करून राष्ट्रीय स्मारक करण्याचे ठरविले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बालपणी जिथून शाळेत जायचे ते सातारा येथिल निवासस्थान महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक विभाग मंत्रालय यांनी 13/2/2007 च्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय स्मारक घोषित केले व 15/4/2013 ला या जागेची किंमत 1 कोटी 82लाख 24हजार 574 ठरविली परंतु याबाबत घराचे मालक उदय आमने यांना विश्वासात न घेता घोषित केली. त्यामुळे उदय आमने यांनी शासनाच्या विरोधात याचिका दाखल केली. काष्ट्राइब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे सातारा दौऱ्यावर असताना उदय आमने यांची भेट घेतली या भेटीत ते म्हणाले की, माझी परिस्थिती बिकट आहे यातून मार्ग काढण्यासाठी व योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा मी सर्व कोर्ट केसेस मागे घेण्याचे आश्वासित करतो त्यानंतर अरुण गाडे यांनी मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांचे सोबत सातत्याने पाठपुरावा केला आणि आज याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. अरुण गाडे यांच्या प्रयत्नाला अखेर यश प्राप्त झाल्याची भावना जनतेमध्ये आहे.
आज मंगळवार दि 23/9/2025 रोजी सामाजिक न्याय मंत्री यांचे दालनात मंत्रालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथिल निवासस्थानावर भव्य-दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांचे अध्यक्षतेखाली व अरुण गाडे यांचे नेतृत्वात संपन्न झालेल्या बैठकीत चर्चा करतांना सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,शिक्षण मंत्री दादा भुसे, काष्ट्राईब महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे आणि शासनाचे विविध अधिकारी तसेच काष्ट्राईब महासंघाचे अजित वाघमारे जिल्हा अध्यक्ष सातारा, यशवंत माटे, संघटक सचिव, विभागीय अध्यक्ष विनोद बनसोड, आरोग्य विभाग अध्यक्ष राजकुमार रामटेके, वैभव गायकवाड, सातारा, घर मालक उदय आमने व काष्ट्राईबचे विविध पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती गजानन थुल‌ राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी कल्याण महासंघ यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular