आर्थिक विषमतेसाठी नसून सामाजिक न्यायासाठी आरक्षण – जयंत साठे
नागपूर ( जयंत साठे) आरक्षण हे आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी नसून सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी उचललेले पाऊल आहे, असे प्रतिपादन पत्रकार जयंत साठे यांनी व्यक्त केले. ते एसीजेपी या सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. डॉ. आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस या संघटनेची नागपूर विभागाची बैठक डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह लष्करी भाग येथे रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार जयंत साठे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्ष के. जे. चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष देवेंद्र घरडे, जिल्हा महासचिव रितेश बंसोड, अॅड. वंदना सहारे आदी उपस्थित होते. या सभेला संबंधित करताना पत्रकार जयंत साठे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी वेगळ्या वसाहती निर्माण करण्याचे धोरण ठेवले होते, परंतु आंबेडकरी समाजातील कोणतेही साहित्यिक किंवा राजकीय पुढारी याबाबत पुढाकार घेताना दिसत नाही याबाबत खंत ही व्यक्ती केली. आरक्षण हे आर्थिक आधारावर असावे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले यावर खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, ज्यांच्यावर सामाजिक अन्याय झालेला आहे त्यांच्यासाठी व सामाजिक न्यायासाठी आरक्षण आहे, असे सांगून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर सामाजिक न्याय झाला असता तर त्यांना आरक्षणाची महती कळली असती, अनिरुद्धाचार्य यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर टीका केली होती जामोद बोलताना ते म्हणाले की, अनिरुद्धाचार्य हे स्वतः सहावी पास असून त्यांना ब्राह्मणी धर्मामुळे आचार्य पद प्राप्त झालेले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वर केलेली टीका ही अशोभनीय असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही जयंत साठे यांनी केली. याप्रसंगी जयंत साठे यांची एसीजेपीच्या नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष के. जे. चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी अमर भांगे, रितेश बंसोड पानतावणे सर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. वंदना सहारे यांनी केले.




