वणी लगतच्या छोरीयात आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा
सुरेंद्र इखारे वणी :- चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ गणेशपूर च्या वतीने छोरीया ले आउट येथील जेष्ठ नागरिक भवनात आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष उदयराव गोहोकार हे होते. प्रमुख पाहुणे विजयराव थेरे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी तसेच सौ.निलीमाताई काळे अध्यक्ष महिला समिती उपस्थित होते.
याप्रसंगी नामदेवराव शेलवडे माजी सैनिक व बालाजी महाराज व्रुद्धाश्रमाचे कार्यकारी संचालक व जेष्ठ नागरिक विमलताई डाहुले यांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.पश्चिम विदर्भ प्रादेशिक जेष्ठ नागरिक मंडळाकडुन चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळाला उत्कृष्ट कार्याबद्दल कार्यगौरव पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक विजयराव गंधेवार यांनी अवयवदान व देहदान या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून अवयवदान व देहदान याचे महत्त्व, व समाजातील अंधश्रद्धा व गैरसमज दूर करून मरावे परी अवयवदान व देहदान रूपी उरावे असे प्रतिपादित केले तसेच अवयवदान व देहदान हा विषय शालेय शिक्षणात समावेश करून अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले तर अध्यक्षीय भाषणातून उदयराव गोहोकार यांनी अवयवदान देहदान केलेल्या जेष्ठ नागरिकांची उदाहरणे देऊन यामध्ये अधिकाधीक सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
प्रास्ताविकातून श्री.लक्ष्मण इद्दे यांनी जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्याची आवश्यकता, अतीव्रुष्टी व महापूराने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फेस्काम मार्फत केलेल्या आवाहनानुसार आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाजी विधाते यांनी केले तर आभार सुभाष आत्राम यांनी मानले. या कार्यक्रमाला वणी परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्करराव खारकर,गुलाब निते,सौ.लिचोडे मॅडम यांनी सहकार्य केले.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चैतन्य जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष उदयराव गोहोकार हे होते. प्रमुख पाहुणे विजयराव थेरे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी तसेच सौ.निलीमाताई काळे अध्यक्ष महिला समिती उपस्थित होते.

